Sat, Dec 27, 2025

महिलांसाठी खूपच फायदेशीर आहे बटरफ्लाय पोज, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

Published:
बटरफ्लाय पोज सोपा परंतु तितकाच फायदेशीर योग आहे. खासकरून महिलांसाठी त्याचे चमत्कारिक फायदे आहेत.
महिलांसाठी खूपच फायदेशीर आहे बटरफ्लाय पोज, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

Benefits of Butterfly Pose:   आजच्या धावपळीच्या जीवनात, निरोगी खाण्याइतकेच निरोगी राहणेदेखील महत्त्वाचे आहे. नियमित योगा अनेक आजारांपासून दूर ठेऊ शकतो. योगा केवळ तणाव कमी करत नाही तर मन आणि मेंदूलाही शांत ठेवतो. योगा मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास फायदेशीर आहे.

अनेक छोट्या-छोट्या योगासनांचा सराव करून आरोग्य चांगले ठेवता येते. त्यातीलच एक प्रकार म्हणजे बटरफ्लाय पोज किंवा तितली आसन होय. तितली आसन अतिशय सोपा परंतु तितकाच फायदेशीर योग आहे. खासकरून महिलांसाठी त्याचे चमत्कारिक फायदे आहेत. चला जाणून घेऊया फायदे…..

बटरफ्लाय पोज-
बटरफ्लाय पोज हा शब्द बटरफ्लाय आणि आसन या दोन शब्दांपासून आला आहे. याचा अर्थ फुलपाखराच्या पोजमध्ये बसणे असा होतो. हे योगासन बद्धकोनासनसारखेच आहे. परंतु अर्धकोनासन आणि बटरफ्लाय पोजमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. या पोजमध्ये, पाय फुलपाखरासारखे वर-खाली हलवले जातात, तर बद्धकोनासनात, पाय जमिनीवर ठेवले जातात. दररोज हे योगासन केल्याने सकाळपासून रात्रीपर्यंत ताजेतवाने राहण्यास मदत होते.

ताणतणाव कमी करते –
बटरफ्लाय योगामुळे पाठदुखी कमी होते आणि स्नायूंचा ताण कमी होतो. नियमित सराव केल्याने अंडाशयात रक्त प्रवाह वाढतो. ज्यामुळे मासिक पाळी नियमित होते. नियमित बटरफ्लाय योगामुळे सर्व प्रजनन अवयवांमध्ये रक्ताभिसरण वाढते, जे फायदेशीर आहे.

कंबरेतील लवचिकता वाढते –
बटरफ्लाय पोजचा नियमित सराव केल्याने शरीराचा थकवा कमी होतो. हे आतड्यांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. यामुळे कंबरेतील लवचिकता वाढते. जर तुम्ही दररोज सकाळी हे आसन केले तर तुमचे कंबरेचे स्नायू लवचिक होतील आणि तुम्हाला ताजेतवाने वाटेल.

गर्भवती महिलांसाठी फायदेशीर-
बटरफ्लाय पोज गर्भवती महिलांसाठी खूप फायदेशीर आहे. ते पोटदुखी आणि कंबरदुखीपासून आराम देते. शिवाय, बटरफ्लाय पोजमुळे कंबर, मांड्या आणि पेल्विक क्षेत्राचा व्यायाम होतो, ज्यामुळे प्रसूती सोपी होते.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)