What diseases are caused by zinc deficiency: आपल्याला निरोगी राहण्यासाठी, सर्व पोषक तत्वे, जीवनसत्त्वे आणि आवश्यक खनिजे असलेला संतुलित आहार आवश्यक आहे. शरीराच्या कार्यात प्रत्येक खनिजाची भूमिका वेगळी आणि तितकीच महत्वाची असते. ज्यामध्ये झिंकचासुद्धा समावेश असतो. झिंकची कमतरता रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकते आणि त्वचेच्या समस्या देखील निर्माण करू शकते.
जेव्हा झिंकची कमतरता असते तेव्हा पहिला परिणाम तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. निरोगी रोगप्रतिकारक शक्तीसाठी झिंक अत्यंत महत्त्वाचा आहे. झिंकच्या कमतरतेमुळे एखाद्या व्यक्तीला संसर्ग होण्याची शक्यता वाढते. विशेषतः फुफ्फुसे आणि पोटाशी संबंधित संसर्ग होतात.
हे ही वाचा
हे संक्रमण, झिंकची कमतरता वाढवू शकतात. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्हाला अशा संसर्गाचा त्रास होतो तेव्हा शरीरातील झिंकची कमतरता बरे होण्याचा कालावधी मंदावते आणि तुमचा आजार लांबवू शकते. झिंकच्या कमतरतेमुळे इतर अनेक समस्या देखील उद्भवू शकतात.
त्वचेच्या समस्या-
झिंकच्या कमतरतेमुळे त्वचेत एक्झिमासारखे बदल होऊ शकतात. त्यामुळे पुरळ, त्वचारोग आणि अॅक्रोडर्माटायटीस एन्टेरोपॅथिका नावाचा गंभीर त्वचेचा आजार देखील होऊ शकतो.
वजन फारच कमी होणे-
झिंकच्या कमतरतेमुळे भूक कमी होऊ शकते आणि आपोआप वजन कमी होऊ शकते.
केस गळणे-
झिंकच्या कमतरतेमुळे केस पातळ होऊ शकतात किंवा गळू शकतात. आणि कधीकधी अलोपेसिया देखील होऊ शकतो.
चव आणि वास घेण्याची क्षमता कमी होणे-
नाक आणि जीभ या इंद्रियांसाठी झिंक आवश्यक आहे. म्हणून याच्या कमतरतेमुळे तुमची चव किंवा वास घेण्याची क्षमता कमी होऊ शकते.
प्रजनन क्षमतेच्या समस्या –
पुरुषांमध्ये, यामुळे हायपोगोनॅडिझम आणि शुक्राणूंचे उत्पादन कमी होऊ शकते. म्हणून, पुरुषांनी झिंकची कमतरता लगेच भरून काढावी.
न्यूरोलॉजिकल समस्या –
गंभीर प्रकरणांमध्ये, झिंकची कमतरता लक्ष केंद्रित करण्यात अडचण आणि मानसिक मंदपणा यासारख्या संज्ञानात्मक समस्या निर्माण करू शकते.
जखमा लवकर न भरणे-
जखमेच्या दुरुस्तीमध्ये झिंक महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणून या कमतरतेमुळे बरे होण्यास बराच विलंब होऊ शकतो.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)