इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे गाड्यांवर नेमका काय परिणाम होतो? या इंधनाचे फायदे आणि तोटे नेमके काय?

Written by:Rohit Shinde
Published:
पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण वाढवण्याचा निर्णय घेतला गेला आहे आणि सरकारने 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल म्हणजेच E20 पेट्रोल देशभर उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे गाड्यांवर नेमका काय परिणाम होतो? या इंधनाचे फायदे आणि तोटे नेमके काय?

भारतामध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण वाढवण्याचा निर्णय घेतला गेला आहे आणि सरकारने 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल म्हणजेच E20 पेट्रोल देशभर उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे याचे फायदे आणि तोटे काय अशा आशयाची चर्चा सध्या सुरू झाली आहे. त्याचबरोबर इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात का, गाड्यांमध्ये बंद पडण्याचे प्रमाण वाढते का अशा आशयाची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या वापराबाबत वाहनचालकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. सरकार प्रदूषण कमी करण्यासाठी आणि परदेशी इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इथेनॉल मिश्रित पेट्रोलला प्रोत्साहन देत आहे. परंतु अनेक चालकांचा विश्वास आहे की या पेट्रोलमुळे इंजिनचे आयुष्य कमी होते, गंज वाढतो आणि वाहनाची कार्यक्षमता घसरते. विशेषतः जुन्या वाहनांच्या इंजिनवर त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. काही ठिकाणी पंपांवर शुद्ध पेट्रोल सहज उपलब्ध होत नसल्याने गोंधळ वाढतो. त्यामुळे वाहनधारक चिंतेत असून अधिकृत स्तरावर तांत्रिक मार्गदर्शन आणि स्पष्ट माहिती दिली जाणे आवश्यक आहे.

इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात का?

E20 पेट्रोल म्हणजे 80% साधे पेट्रोल आणि 20% इथेनॉलचे मिश्रण. इथेनॉल ऊस आणि धान्यांपासून तयार होते. हे इंधन प्रदूषण कमी करते, शेतकऱ्यांना फायदा देते आणि परकीय तेल आयात कमी करते. सध्या तरी मोठ्या प्रमाणात गाड्या अचानक बंद होतात अशी अधिकृत किंवा गंभीर नोंद झालेली नाही. सरकार, वाहन उद्योग संस्था (SIAM) आणि ARAI यांनी स्पष्ट केलं आहे की E20 वापरामुळे सुरक्षेचा धोका नाही. पण जुन्या आणि E20-रेडी नसलेल्या वाहनांमध्ये इंजिनची झीज, गॅस्केट खराब होणं किंवा सुरुवातीला परफॉर्मन्स कमी होणं यांसारख्या समस्या आढळू शकतात. त्यामुळे “गाडी बंद पडते” हा दावा केला जात आहे. पण हे खरं नाही, असं असलं तरी तज्ज्ञांनी जुन्या वाहनधारकांनी सावध राहणं गरजेचं आहे.

इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे फायदे आणि तोटे

पर्यावरण संरक्षण इथेनॉल मिसळल्याने CO₂ उत्सर्जन कमी होतं. ऊश शेतकऱ्यांना थेट फायदा होईल त्यांच्यासाठीी नवीन बाजारपेठ तयार होते. एवढ नाही तर पेट्रोलमध्ये इथनॉल मिसळल्यामुळे कच्च्या तेलाची आयात कमी होईल, ज्यामुळे देशाचा खर्च वाचेल. इथेनॉलमुळे काही इंजिनांचे परफॉर्मन्स सुधारते. भारताच्या ग्रीन एनर्जी धोरणातील देखील ही महत्त्वाची पायरी आहे. कारण E20 पेट्रोलमुळे कार्बनचा उत्सर्जन देखील कमी होणार आहे. वाहनांचे मायलेज साधारण 2% ते 6% कमी होते. जुन्या वाहनांमध्ये रबर, प्लास्टिक वा मेटल पार्ट्सवर इथेनॉलचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. काही प्रकरणांत हार्ड स्टार्ट, गाडी जास्त आवाज करणे किंवा इंजिनची झीज यांसारखे आजार उद्भवतात.