Bangladeshi Infiltrators: बांगलादेशींची वाढती अवैध घुसखोरी; महाराष्ट्र सरकारची घुसखोरांवर करडी नजर

Written by:Rohit Shinde
Published:
महाराष्ट्रात वाढत्या बांगलादेशी घुसखोरीवर आता कठोर पावले उचलण्यात येणार आहेत. राज्य सरकारने अवैध बांगलादेशी नागरिकांना ओळखून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
Bangladeshi Infiltrators: बांगलादेशींची वाढती अवैध घुसखोरी; महाराष्ट्र सरकारची घुसखोरांवर करडी नजर
भारत आणि महाराष्ट्रात बांगलादेशी नागरिकांची वाढती अवैध घुसखोरी ही गंभीर चिंता बनली आहे. सीमावर्ती भागातून होणाऱ्या या प्रवेशामुळे सुरक्षा यंत्रणांना मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अनेक घुसखोर स्थानिक नागरिकांच्या वेशात राहात आहेत आणि विविध क्षेत्रांत काम करत आहेत. यामुळे रोजगार, सुरक्षा आणि सामाजिक समतोलावर परिणाम होत आहे. महाराष्ट्र सरकार आणि पोलिस प्रशासन या घुसखोरांवर काटेकोर नजर ठेवून कारवाई करत आहेत. त्यादृष्टीने राज्य सरकारने आता आणखी तगडे नियोजन आखले आहे.

बांगलादेशी घुसखोरांवर करडी नजर

राज्यात वाढत्या अवैध बांगलादेशी स्थलांतरामुळे निर्माण झालेल्या सुरक्षेच्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारने सर्व जिल्हा प्रशासनांना विशेष निर्देश दिले आहेत. याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात आंतरिक विचारमंथन बैठक घेऊन, अशा व्यक्तींच्या ओळख आणि तपासणीसाठी अंमलबजावणी योजना तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्य सरकारने अवैध बांगलादेशी नागरिकांना ओळखून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गृह विभागाने याबाबत नवे आदेश जारी केले असून, बांगलादेशी घुसखोरांची ब्लॅकलिस्ट तयार करण्यासोबतच रेशन कार्डांच्या सत्यापनाची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.

राज्यात वाढत्या अवैध बांगलादेशी स्थलांतरामुळे निर्माण झालेल्या सुरक्षेच्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारने सर्व जिल्हा प्रशासनांना विशेष निर्देश दिले आहेत. याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात आंतरिक विचारमंथन बैठक घेऊन, अशा व्यक्तींच्या ओळख आणि तपासणीसाठी अंमलबजावणी योजना तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, अँटी टेररिझम स्क्वॉडकडे या संदर्भातील अहवाल पाठविण्याचेही निर्देश आहेत.

अशा अवैध बांगलादेशी नागरिकांची स्वतंत्र ब्लॅकलिस्ट तयार करण्यात यावी, जेणेकरून त्यांना कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही. तसेच, आधीच ATS कडून प्राप्त झालेल्या १,२७४ बांगलादेशी नागरिकांच्या यादीतील व्यक्तींना शासकीय दस्तऐवज जसे की रेशन कार्ड, ओळखपत्र किंवा इतर सुविधा जारी झाल्या आहेत का, याची सखोल चौकशी करण्यात यावी.

बांगलादेशी घुसखोरांमुळे वाढणारे धोके

बांगलादेशी घुसखोरांमुळे देशात विविध प्रकारचे धोके वाढत आहेत. अवैधरित्या भारतात प्रवेश करणारे हे घुसखोर अनेकदा बनावट कागदपत्रे वापरून नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होतो. काही घुसखोर गुन्हेगारी, दहशतवादी किंवा अंमली पदार्थांच्या व्यवहारात सहभागी होत असल्याचे आढळले आहे. याशिवाय, स्थानिक नागरिकांच्या रोजगाराच्या संधी कमी होतात आणि सामाजिक असंतुलन वाढते. सरकार आणि सुरक्षा यंत्रणा अशा घुसखोरांवर नजर ठेवून त्यांना शोधण्याचे प्रयत्न करत आहेत. नागरिकांनीही संशयास्पद हालचालींची माहिती प्रशासनाला देऊन या समस्येच्या निराकरणात हातभार लावणे आवश्यक आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews