दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; विलंब शुल्कासह ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार ऑनलाईन परीक्षा अर्ज !

Written by:Rohit Shinde
Published:
विलंब शुल्कासह अर्ज भरण्यास 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; विलंब शुल्कासह ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार ऑनलाईन परीक्षा अर्ज !

दहावीची बोर्ड परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक अत्यंत महत्त्वाची पायरी मानली जाते. ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची, अभ्यासातील शिस्तीची आणि मेहनतीची खरी कसोटी असते. दहावीच्या निकालावर पुढील शिक्षणाचा मार्ग ठरतो. विज्ञान, वाणिज्य किंवा कला शाखेत प्रवेश घेण्याचा निर्णय या टप्प्यावरच घेतला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या परीक्षेकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक असते.

यशस्वी निकाल विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देतो आणि भविष्यातील करिअरसाठी मजबूत पाया घालतो. तसेच ही परीक्षा स्पर्धात्मक परीक्षांसाठीची तयारी करण्याची सुरुवातही ठरते. अशा परिस्थितीत यंदा दहावीची बोर्ड परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची अशी बातमी समोर आली आहे.

17 नोव्हेंबरपर्यंत भरता येणार अर्ज

दहावीच्या बोर्ड परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरायचे आहेत. या ऑनलाईन अर्ज भरण्याच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परिक्षेस बसणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या शाळा प्रमुखांमार्फत भरावयाचे आहेत. विलंब शुल्कासह अर्ज भरण्यास 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सूचना

इ. 10 वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या माध्यमिक शाळेमार्फत भरावी. सर्व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील महत्त्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षा अर्जासंबंधी तसेच अन्य कोणतेही काम करताना शाळेतील संबंधित शिक्षक तसेच तंत्रज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे. कारण, दहावीची परीक्षा ही जीवनाला कलाटणी देणारी अशा स्वरूपाची परीक्षा असते. या काळात कोणत्याही चुका न करता योग्य पद्धतीने खरंतर ही प्रक्रिया पार पाडावयची असते.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews