प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांचं लक्ष पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 2000 कधी मिळणार याकडे लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 21 व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील अशा चर्चा होत्या. त्यामुळे ही प्रतीक्षा नेमकी संपणार कधी? असा सवाल आता शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना 21 व्या हप्त्यासंदर्भात आणखी वाट पाहावी लागेल, असे चित्र सध्या दिसत आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना 21 वा हप्ता कधी मिळणार?
हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंड या तिन्ही राज्यांतील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता थेट जमा करण्यात आला आहे. तसेच जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांनाही या मदतीचा लाभ देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रासह उर्वरित राज्यांना नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रु जमा होणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तीन राज्यांतील शेतकऱ्यांना आधीच २१वा हप्ता देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमधील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट निधी जमा करण्यात आला आहे. या राज्यांमध्ये अलीकडेच अतिवृष्टी आणि पुरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी पिके वाहून गेली, शेतीयोग्य जमीन साचलेल्या पाण्यामुळे वाया गेली आणि शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तत्काळ निर्णय घेत या राज्यांतील शेतकऱ्यांना मदत देण्यास प्राधान्य दिले.
२०१९ पासून योजना अविरत सुरू
पीएम किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारनं फेब्रुवारी 2019 मध्ये सुरु करण्यात आली होती. शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. आता खरिप हंगामाच्या निमित्तानं 20 व्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना एका वर्षात 6 हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना 19 हप्त्यांचे 2000 रुपयांप्रमाणं पैसे देण्यात आले आहेत. आता पीएम किसान सन्मान निधीच्या 20 व्या हप्त्याची रक्कम कधी मिळते याकडे शेतकऱ्याचंं लक्ष लागलं आहे. पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांना 24 फेब्रुवारी 2025 रोजी देण्यात आले होते. योजनेतील सातत्य लक्षात घेता शेतकऱ्यांना आगामी २० वा हप्ता देखील वेळेत मिळेलच, अशी आशा व्यक्त केली जात आहे.





