लाडक्या बहिणींचं ई-केवायसीमुळे टेन्शन वाढलेले आहे. शिवाय आता दिवाळी देखील तोंडावर आलेली आहे. अशा परिस्थितीत राज्यातील पात्र लाडक्या बहिणींना भाऊबीजेनिमित्त मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ञक्टोबर महिन्याचा हप्ता, अधिकची ओवाळणी आणि नोव्हेंबरचा हप्ता असे मिळून 5,500 रूपये एकाच वेळी महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महिलांच्या खात्यामध्ये 5,500 रू. जमा होणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाडक्या बहिणींना दिवाळीसाठी आनंदाची बातमी आहे. भाऊबीजेनिमित्त लाडक्या बहिणींना ओवाळणी म्हणून 5500 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे फक्त पात्र महिलांनाच मिळणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी दोन महत्त्वाच्या अटी ठेवल्या आहे. ऑक्टोबरचा दिवाळीपूर्वी आगाऊ हफ्ता तसेच दिवली बोनस ओवाळणी आणि नोव्हेंबरच हफ्ता असे एकूण 5500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. या साठी दोन अटी केल्या आहे.
दोन अटींची पूर्तता करावी लागणार ?
ज्या बहिणींना या योजनेच्या पहिल्या हफ्तापासून जून 2024 ते सप्टेंबर 2025 पर्यंतचे सर्व 15 हफ्ते कोणताही खंड न पडता जमा झाले आहे. त्याच पात्र असतील. त्यांनाच ओवाळणी मिळणार आहे. तसेच ज्या बहिणींचे केवायसी, बँक खाते लिंकिंग पूर्ण असतील आणि त्यांचे अर्ज होल्डवर नसतील त्या पात्र असतील.
बहिणींनो, ई-केवायसी पूर्ण करून घ्या!
योजनेतील महिला लाभार्थ्यांसाठी आता एक मोठा बदल करण्यात आला आहे. केवळ लाभार्थी महिलेचेच नाही, तर त्या महिलेचे पती किंवा वडिलांचे ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नव्या नियमानुसार, सरकार आता लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासोबतच तिच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न पडताळून पाहणार आहे.
- लाभार्थी महिलांना https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर जाऊन ई-केवायसी करायची आहे.
- संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमची काही महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती पुन्हा अपलोड करावी लागेल.
- तुमचे नाव, पत्ता, शिधापत्रिका (रेशन कार्ड) क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्डची माहिती यांचा समावेश असेल. प्रोसेस पूर्ण होईल.
यामध्ये विवाहीत महिलांना आपल्या पतीची आणि मुलींना आपल्या वडिलांची ई-केवायसी देखील करून घ्यावी लागणार आहे. निर्धारीत मुदतीमध्ये प्रक्रिया पार पाडावी लागेल.





