मुंबई लोकल ही शहराची जीवनरेखा मानली जाते. परंतु रविवारी होणाऱ्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. रेल्वेच्या देखभाल आणि दुरुस्ती कामांसाठी हा मेगाब्लॉक आवश्यक असला तरी त्यामुळे अनेक गाड्या उशिरा धावतात किंवा रद्द होतात. प्रवाशांना लांब रांगा, गर्दी, उशीर आणि असुविधा यांचा सामना करावा लागतो. अनेक वेळा पर्यायी प्रवास व्यवस्था नसल्याने कामावर जाणारे आणि प्रवास करणारे लोक अडचणीत सापडतात. उद्या रविवारी, 16 ऑक्टोबर रोजी देखील मुंबईत मेगाब्लॉक असणार आहे.
उद्याच्या मेगाब्लॉकचे कसे नियोजन?
बईत ऊद्या सेंट्रल रेल्वेकडून उपनगरीय मार्गांवर ‘मेगा ब्लॉक’ जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही ब्लॉक नसेल. माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येत आहे.
माटुंगा ते मुलुंड (अप आणि डाऊन फास्ट लाईन): सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 पर्यंत मेगाब्लॉक असेल . छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी10.36 ते दुपारी 3.10 दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकात डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. या कालावधीत सुटणाऱ्या डाऊन फास्ट गाड्या माटुंगा स्थानकापासून डाऊन स्लो लाईनवर वळवण्यात येतील आणि मुलुंडपर्यंत सर्व स्थानकांवर थांबतील. या गाड्या आपल्या गंतव्यस्थानी साधारण 15 मिनिटे उशिराने पोहोचतील. तर ठाण्यानंतर या गाड्या पुन्हा फास्ट लाईनवर धावतील. तसेच ठाण्याहून सुटणाऱ्या अप फास्ट गाड्याही मुलुंडपासून माटुंगापर्यंत स्लो लाईनवर धावतील आणि त्या देखील 15 ते 20 मिनिटे उशिराने पोहोचतील.
ठाणे – वाशी / नेरुळ (ट्रान्स हार्बर लाईन): सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत ब्लॉक असेल. या काळात ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यानची सर्व अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर सेवा पूर्णपणे बंद राहील. ठाण्याहून सुटणाऱ्या वाशी/नेरुळ/पनवेलकडे जाणाऱ्या गाड्या आणि पनवेलकडून ठाण्याकडे येणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
वेळापत्रक पाहून प्रवास करा!
या मेगाब्लॉकच्या काळात प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असे आवाहन सातत्याने रेल्वे प्रशासनाकडून केले जात असते. बऱ्याचदा अनेक गाड्या उशिरा येतात, विलंब होतो अशावेळी प्रवाशांनी पर्यायी प्रवासाच्या साधनांचा वापर करावा. शिवाय पावसाचे दिवस असल्याने आणखी काळजी घेणे आवश्यक ठरते.





