Ladki bahin Yojana: ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यामुळे धाकधुक वाढली; १,५०० रू. नेमके कधी मिळणार?

Written by:Rohit Shinde
Published:
लाडक्या बहिणींची ऑक्टोबर महिन्याच्या १,५०० रूपयांबाबतची धाकधुक वाढली आहे. कारण दिवाळीचा सण, भाऊबीज संपली तर पैसे महिलांना मिळाले नाहीत. त्यामुळे खात्यामध्ये ऑक्टोबरचा हप्ता नेमका कधी येणार? असा सवाल महिलांकडून उपस्थित केला जात आहे.
Ladki bahin Yojana: ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यामुळे धाकधुक वाढली; १,५०० रू. नेमके कधी मिळणार?

लाडक्या बहिणींना भाऊबीजेला ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रूपये मिळतील, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र तो अंदाज आता फोल ठरला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचे १,५०० रू. नेमके कधी जमा होणार, असा सवाल आता बहिणींमधून उपस्थित केला जात आहे.  दिवाळी संपली तरी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला आहे.

ऑक्टोबर महिन्याचे १,५०० रू. कधी मिळणार?

. ऑक्टोबर महिना संपत आल्याने अद्याप तरी या महिन्याच्या हप्त्याबाबत कोणतेही घोषणा सरकारकडून करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.ऑक्टोबर महिन्यात दिवाळी असल्याने याच मुहूर्तावर पैसे मिळतील अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. त्यामुळे आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सुद्धा पुढील महिन्याच्या म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दोन ते तीन दिवसांत किंवा पहिल्या आठवड्याभरात लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यांचे पैसे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, या संदर्भात अद्याप सरकारकडून कोणतेही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी स्थगित

महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.  राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी घातलेली E KYC ची अट स्थगित केली आहे. तसेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ताही पुढच्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार आहे. खरं तर इ केवायसी मुळे लाडक्या बहिणी टेन्शन मध्ये आल्या होत्या, मात्र आता त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. लाडकी बहीण योजनेचा फायदा अनेक जण पात्र नसताना सुद्धा घेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकारने या योजनेसाठी ही केवायसी करण्याची अट घातली होती.

मात्र, ई-केवायसी करताना महिलांना अनेक अडचणी येत होत्या तर ई-केवायसी केल्यास अनेक महिलांची नावे यादीतून कट होण्याची शक्यता होती. त्यामुळेच महिला वर्गात मोठ्या भीतीचे वातावरण पसरले. सरकार जाणून-बुजून आम्हाला अपात्र करण्यासाठी ही केवायसी ची अट घालत आहे अशी भावना महिलांमध्ये सुरू झाली. त्यातच आगामी काळात जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. अशावेळी जर महिला नाराज झाल्या तर त्यांच्या नाराजीचा फटका हा निवडणुकीत बसू शकतो. म्हणूनच सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी इ केवायसीची अट तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे असं बोललं जात आहे. मात्र सरकारकडून अद्याप यामागचं कारण स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews