MP Breaking News
Tue, Dec 16, 2025

अवघ्या 22 लाखांत नवी मुंबईतील प्राईम लोकेशनवर सिडकोचे घर; अधिक माहिती जाणून घ्या !

Written by:Rohit Shinde
सिडकोकडून नवी मुंबई शहरात हक्कांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सर्वसामान्यांसाठी आता सिकडोकडून स्वस्तात घरांची लॉटरी काढण्यात आली आहे.
अवघ्या 22 लाखांत नवी मुंबईतील प्राईम लोकेशनवर सिडकोचे घर; अधिक माहिती जाणून घ्या !

नवी मुंबईत घर घेणे हे अनेकांचे स्वप्न आहे. स्वच्छ, नियोजनबद्ध आणि आधुनिक सुविधा असलेल्या या शहरात आपले स्वतःचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. या स्वप्नपूर्तीत सिडकोची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सिडकोने नवी मुंबईचे नियोजन करून परवडणारी घरे, प्लॉट्स आणि टाउनशिप विकसित केल्या आहेत. सामान्य नागरिकांना परवडतील अशा योजनांद्वारे घर उपलब्ध करून देणे हा त्यांचा उद्देश आहे. अशा परिस्थितीत नवी मुंबईतील प्राईम लोकेशनवर घर खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी एक गुडन्यूज समोर येत आहे.

22 लाखांत नवी मुंबईतील प्राईम लोकेशनवर सिडकोचे घर

आयुष्यात प्रत्येकाला स्वता:चे हक्काचे घर असावे असं वाटत त्यासाठी सर्वजण खुप मेहनत करत असतो. पण शहरात घरांच्या वाढत्या किंमतीमुळे हे स्वप्न अपूर्ण राहते. आता प्रत्येकाचे हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे कारण सिडकोकडून बंपर लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे. चला तर जाणून घेऊयात जर तुम्हालाही सिडकोच्या घरासाठी अर्ज करायच असेल तर तो कसा शिवाय मुख्य म्हणजे नेमक्या कोणत्या शहरात आणि कोणत्या ठिकाणी घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

सिडकोकडून नवी मुंबई शहरात हक्कांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सर्वसामान्यांसाठी आता सिकडोकडून स्वस्तात घरांची लॉटरी काढण्यात आली आहे. नवी मुंबई असलेल्या अटल सेतूपासून अगदी काही अंतरावर असलेल्या द्रोणागिरी नोडमध्ये फक्त आणि फक्त 22 लाखांत तुम्हाला घर खरेदीची संधी मिळून शकते. द्रोणागिरी नोडमध्ये नाही तर तळोजा आणि खारघकर या भागातही सिकडोकडून तुम्हाला स्वस्तात घर खरेदी करता येऊ शकतात. सिकडोचे घर खरेदीसाठी तुम्हाला सिडकोच्या वेबसाइट cidcofcfs.cidcoindia.com वर जाऊन अर्ज करावा पण तो तुम्हाला 21 डिसेंबरच्या 2025 च्या आत करावा लागणार आहे.

सिडकोच्या स्वस्त आणि मस्त घरांचे सामान्यांसाठी महत्व

सिडकोच्या स्वस्त आणि मस्त घरांचे सामान्यांसाठी फार मोठे महत्त्व आहे. वाढत्या महागाईमुळे आणि घरांच्या किमती गगनाला भिडल्याने सामान्य व मध्यमवर्गीय नागरिकांसाठी स्वतःचे घर घेणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत सिडकोकडून दिली जाणारी परवडणारी घरे दिलासा देणारी ठरतात. या घरांमुळे नागरिकांना सुरक्षित, नियोजनबद्ध आणि मूलभूत सुविधा असलेल्या परिसरात राहण्याची संधी मिळते. रोजगार, शिक्षण, आरोग्य व वाहतूक सुविधांच्या जवळ घरे उपलब्ध झाल्याने जीवनमान उंचावते. सिडकोची घरे सामान्यांच्या घराच्या स्वप्नाला साकार करण्यास मदत करतात.