यंदाचा पावसाळा चांगलाच लांबला…त्यानंतर आता पावसाने बहुतांश भागाच उघडीप दिली आहे. अशा परिस्थितीत थंडीच्या बाबतीत मोठी माहिती समोर येत आहे. दक्षिण भारतात अजूनही पावसाचे सत्र कायम असून, महाराष्ट्र आणि मध्य भारतात हळूहळू थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात आगामी काही दिवसांत तापमानात 3 ते 4 अंशांनी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. भारतातील हवामानात सतत बदल होत आहेत. सध्या देशभरात वेगवेगळे हवामानाचे प्रकार दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत आता खऱ्या अर्थाने हिवाळ्याची सुरूवात होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
महाराष्ट्रात थंडीची चाहूल
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत महाराष्ट्रासह देशाच्या पश्चिम आणि मध्य भागात किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील नागरिकांना थंडीचा स्पर्श लवकरच जाणवणार आहे. यावर्षी मागील 25 वर्षांच्या तुलनेत थंडी थोडी जास्त भासणार आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा जसा रेकॉर्डब्रेक ठरला अगदी त्याचप्रमाणे यंदाची थंडी देखील रेकॉर्ड ब्रेक ठरते का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा
पुढील चार ते पाच दिवस तापमानात घट होणार असून, हवामान कोरडे राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः गुजरातच्या सीमावर्ती भागातही तापमानात घट होणार आहे. कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही ठिकाणी मात्र ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाची शक्यता कायम आहे. विदर्भात थंडीची चाहूल अधिक स्पष्टपणे जाणवणार आहे. नागपूरमध्ये किमान तापमान 17 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता असून, सकाळ-संध्याकाळी गारवा वाढेल.
थंडीचा जोर वाढणार !
रब्बी हंगामाच्या कामाला वेग
महाराष्ट्रात हळूहळू वाढणारी थंडी आता स्पष्टपणे जाणवू लागली आहे. सकाळच्या आणि रात्रीच्या वेळी गारवा वाढल्याने शेतीसाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. या थंडीमुळे रब्बी हंगामाच्या पिकांची लागवड वेगाने सुरू झाली आहे. गहू, हरभरा, ज्वारी, मका आणि मोहरी यांसारख्या पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी उत्साहाने काम करत आहेत. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत तापमानात आणखी ३ ते ४ अंशांची घट होईल, असा अंदाज वर्तवला आहे.