अद्याप अकरावीसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरूच आहे. आता माध्यमिक व उच्च माध्यमिक अकरावीसाठी संचालनालयाने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अखेरची संधी देऊ केली आहे. राज्यभरात अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरलेले सुमारे १० हजार विद्यार्थी अद्यापही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. या दहा हजार विद्यार्थ्यांना २२ ते २५ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या प्रवेश परीक्षेच्या निमित्ताने अंतिम संधी मिळेल. यामध्ये दुबार परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना देखील प्रवेशाची संधी मिळणार आहे.
अकरावी प्रवेशासाठी ही शेवटची संधी
राज्यातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तरी अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरूच आहे. शिक्षण संचालनालयाने विद्यार्थ्यांना आता शेवटची संधी दिली आहे. अर्ज भरूनही सुमारे दहा हजार विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. त्यांना २२ ते २५ सप्टेंबर दरम्यान संधी मिळेल. यंदा १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १३ लाखांहून अधिक जणांनी प्रवेश निश्चित केले आहेत. २५ सप्टेंबरपर्यंत प्रवेशाची अंतिम मुदत आहे.
यंदा राज्यभरातून १४ लाख ८५ हजार ६८६ विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १३ लाख ४३ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग एक आणि भाग दोन पूर्ण भरून आपले अर्ज निश्चित केले. अकरावीच्या विविध प्रवेश फेऱ्यांनंतर आता एकूण १३ लाख ३३ हजार ८९३ विदयार्थ्यांनी त्यांचे प्रवेश विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये निश्चित केले आहेत.
प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अखेरची संधी
या फेरीसाठी कनिष्ठ महाविद्यालयांमधील रिक्त जागा जाहीर करणे, कोट्याच्या जागा जाहीर करणे, प्रवेशक्षमता वाढवणे आदी प्रक्रिया २२ सप्टेंबर रोजी केल्या जातील. २२ आणि २३ सप्टेंबरला नवीन विद्यार्थी नोंदणी, अर्जाच्या भाग १ मध्ये दुरुस्ती करणे, प्राधान्यक्रम देणे, आदी गोष्टींसाठी मुदत देण्यात आली आहे. ज्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे, ती महाविद्यालये २४ आणि २५ सप्टेंबर या दोन दिवसांत संबंधित विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना प्रवेशासाठी बोलावतील. २५ सप्टेंबर ही प्रवेशाची अंतिम मुदत असेल. या मुदतीनंतर विद्यार्थ्यांना पुढील संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही, असे संचालनालयाने जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सावधगिरीने ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.






