राज्यात आज पुन्हा मुसळधार पाऊस बरसणार; हवामान विभागाचा अंदाज काय?

Written by:Rohit Shinde
Published:
Last Updated:
राज्यातील काही जिल्ह्यांत आज पुन्हा मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांना आज पुन्हा अलर्ट देण्यात आला आहे. नेमका हवामान विभागाने काय अंदाज वर्तवला? सविस्तर जाणून घेऊ...
राज्यात आज पुन्हा मुसळधार पाऊस बरसणार; हवामान विभागाचा अंदाज काय?
राज्यात मान्सूनने विक्रमी वेळेत हजेरी लावली आहे. मान्सून पावसाने 10 दिवस आधीच हजेरी लावली असून, कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः दक्षिण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबईतही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नेमकी राज्यभरात पावसाची स्थिती आज काय राहणार आहे, याबाबत आपण हवामान विभागाचा अंदाज सविस्तरपणे जाणून घेऊ…

तळकोकण, पश्चिम महाराष्ट्राला इशारा

तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा भाग तसेच रत्नागिरी या जिल्ह्यांत मान्सून दाखल झाला आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे या भागात आज तुफान पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या भागात ढगाळ वातावरण असून पुरस्थिती निर्माण झाल्याचे चित्र सध्या आहे.

मुंबई, ठाणे, पालघरला धोका

विदर्भ आणि मराठवाड्यात आज ढगाळ वातावरण राहणार आहे, मात्र या भागातील बहुतांश जिल्ह्यांत तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, अकोला या भागात तुरळक पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील अहिल्यानगर, बीड जिल्ह्यात मात्र मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करणम्यात आलं आहे.