Weather Update: महाराष्ट्रातून थंडी अचानक गायब होणार ? हवामान विभागाचा अंदाज काय ?

Written by:Rohit Shinde
Published:
Last Updated:
अनेक राज्यांत शीतलहरीचा इशारा असून पुढील 7 दिवस हवामान असेस असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही याचा परिणाम जाणवणार असून, येत्या काही दिवसांत किमान तापमानात 2 ते 4 अंशांची घट होऊन थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Weather Update: महाराष्ट्रातून थंडी अचानक गायब होणार ? हवामान विभागाचा अंदाज काय ?

हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील हवामानाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. उत्तर भारतात कडाक्याची थंडी आणि बर्फवृष्टीमुळे 11 राज्यांत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली-यूपीसह अनेक राज्यांत शीतलहरीचा इशारा असून पुढील 7 दिवस हवामान असेस असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही याचा परिणाम जाणवणार असून, येत्या काही दिवसांत किमान तापमानात 2 ते 4 अंशांची घट होऊन थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज

उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश आणि बिहारमध्ये असेच हवामान राहण्याची शक्यता आहे. काश्मीर आणि उत्तराखंडच्या उंचावरील भागांत बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, ज्यामुळे डोंगरदऱ्यांमध्ये पांढरी चादर पसरली असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. महाराष्ट्रात सध्या पावसाची शक्यता नसून हवामान प्रामुख्याने कोरडे राहील. मात्र, उत्तर भारतातील थंडीचा परिणाम म्हणून राज्यातील किमान तापमानात पुढील 4 दिवसांत 2 ते 3 अंशांची घट होण्याची शक्यता आहे.

कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर परिसरात सोमवारी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळी हलकं धुके जाणवू शकतं. गेल्या काही दिवसांतील कडाक्याची थंडी सध्या कमी झाली असून गारवा सौम्य स्वरूपात राहील.  पश्चिम महाराष्ट्रात पुणे शहर आणि परिसरात ढगाळ हवामानाचा प्रभाव जाणवत आहे. धुक्यामुळे आणि ढगांमुळे किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीचा तीव्रपणा कमी झाला आहे. पुणे शहरात सोमवारी सकाळी धुके राहील, तर दिवसभर वातावरण ढगाळ ते अंशतः स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे.

मराठवाडा-विदर्भातील हवामान कसे असेल ?

राठवाडा आणि विदर्भात हवामानाची स्थिती थोडी वेगळी राहणार आहे. मराठवाड्यात सोमवारी ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता असून, दिवस सरताच आकाश हळूहळू स्वच्छ होईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहणार आहे. विदर्भात ढगाळ वातावरण निवळत असून हवामान कोरडं राहील. अमरावतीसारख्या भागांत किमान तापमान सुमारे 14 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकुणच कमी अधिक फरकाने राज्यातील थंडी काहीशी वाढणार असली तर काही दिवसांनंतर थंडी राज्यातून गायब होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews