नव्या वर्षाचा (2026) आजचा पहिला आहे. नवीन सुरुवात होताच महागाईचा फटका बसला आहे. 1 जानेवारीला सरकारने महत्वपूर्ण आणि रोजच्या वापरातल्या गोष्टीची किंमत वाढवली आहे. सरकारने एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 111 रुपयांची वाढ जाहीर केली असून ही वाढ आजपासून लागू झाली आहे. हे 19 किलो वजनाच्या कमर्शियल सिलेंडरच्या किंमतीतील वाढ आहे. कमर्शियल सिलेंडर महाग झाल्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट तसेच छोट्या व्यावसायिकांचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. नव्या दरांनुसार, दिल्लीत 19 किलोचा कमर्शियल एलपीजी सिलेंडर आता 1,691.50 रुपयांना मिळणार आहे. याआधी त्याची किंमत 1,580.50 रुपये होती. कोलकात्यात हा सिलेंडर 1,795 रुपयांचा झाला असून पूर्वी 1,684 रुपये होता. मुंबईत कमर्शियल सिलेंडरची किंमत आता 1,642.50 रुपये आहे, जी आधी 1,531 रुपये होती.
व्यावसायिक एलपीजी 111 रूपयांनी महागला !
वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा मोठा झटका बसला आहे. तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता, चेन्नई यांसारख्या मोठ्या शहरांसोबतच देशभरात 1 जानेवारी 2026 पासून हे दर वाढले आहेत. तेल कंपन्यांनी किंमतीत केलेली ही वाढ 1 किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलेंडरवर असून प्रति सिलेंडर 111 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र, 14 किलोच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नवीन दर 1 जानेवारी 2026 पासून लागू केले जातील.
- मुंबईमध्ये 1531.50 रुपयांना मिळणारा एलपीजी सिलेंडर आता 1642.50 रुपयांना मिळणार आहे.
- दिल्लीमध्ये आतापर्यंत 1580.50 रुपयांना मिळणारा 19 किलोचा कमर्शियल सिलेंडर आता 1691.50 रुपयांना मिळणार आहे.
- कोलकातामध्ये याची किंमत 1684 रुपयांवरून वाढवून आता 1795 रुपये करण्यात आली आहे.
- चेन्नईमध्ये याची किंमत 1739.5 रुपयांवरून वाढवून 1849.50 रुपये करण्यात आली आहे.
घरगुती एलपीजीच्या किंमतीत बदल नाही!
दरम्यान, 14 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सरकारने स्पष्ट केले आहे की घरगुती गॅसच्या दरांमध्ये स्थिरता कायम ठेवण्यात आली आहे. सध्या देशातील बहुतांश शहरांमध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 850 ते 960 रुपयांच्या दरम्यान आहे. दिल्लीत हा सिलेंडर 853 रुपये, मुंबईत 852.50 रुपये, लखनऊमध्ये 890.50 रुपये, अहमदाबादमध्ये 860 रुपये, हैदराबादमध्ये 905 रुपये, वाराणसीमध्ये 916.50 रुपये आणि पटण्यात 951 रुपयांना मिळत आहे.
इंडियन ऑइलच्या अधिकृत माहितीनुसार, पटण्यात 19 किलोचा कमर्शियल सिलेंडर आता 1,953.50 रुपयांना मिळणार आहे. नोएडामध्ये त्याची किंमत 1,691 रुपये, लखनऊमध्ये 1,814 रुपये, भोपाळमध्ये 1,696 रुपये आणि गुरुग्राममध्ये 1,708.50 रुपये इतकी झाली आहे. सिलेंडरची किंमत अनेक कारणांमुळे ठरते. याची गणना मुख्यत्वे इम्पोर्ट पॅरिटी प्राईसच्या आधारावर केली जाते. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसची किंमत, डॉलर आणि रुपयामधील विनिमय दर, वाहतूक खर्च, विमा आणि टॅक्ससारख्या खर्चांचा समावेश होतो. याव्यतिरिक्त, प्रत्येक राज्यामध्ये टॅक्स आणि वितरणाशी संबंधित खर्च वेगवेगळा असतो.






