भारतीय रेल्वेला प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळते कारण ती स्वस्त, सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवासाचे माध्यम आहे. रेल्वेच्या माध्यमातून देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात सहज पोहोचता येते. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वे सर्वात किफायतशीर पर्याय मानली जाते. प्रवाशांना स्लीपर, एसी, जनरल अशा विविध श्रेणींमध्ये प्रवासाची सुविधा मिळते. ऑनलाइन तिकीट बुकिंग, खाद्यसेवा, स्वच्छता आणि वेळेवर धावणाऱ्या गाड्या यामुळे रेल्वेवरील विश्वास वाढला आहे. ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणाऱ्या या सेवेमुळे भारतीय रेल्वे ही केवळ वाहतुकीचे साधन नसून देशाच्या प्रगतीचे प्रतीक बनली आहे. मात्र आता रेल्वेच्या बुकींग संबंधिच्या नियमांमध्ये काही महत्वपूर्ण बदल होणार आहेत.
IRCTC Ticket Booking नियमांत बदल
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आयआरसीटीसीने तिकीट बुकिंग नियमांमध्ये पुन्हा एकदा बदल केले आहेत. यापूर्वी ऑनलाईन तिकीट बुकिंग संदर्भात अनेक बदल करण्यात आले होते. त्यानंतर आता नवीन बदल केले आहेत. आयआरसीटीसीने ऑनलाRन रेल्वे तिकिट बुकिंगसाठी कडक नियम लागू केले आहेत. ज्या युजर्सचे आयआरसीटीसी अकाऊंट आधारशी लिंक केलेले नाही ते आता सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आरक्षित तिकिटे बुक करू शकणार नाहीत. हा नियम फक्त पहिल्यांदाच रेल्वे आरक्षण सुरू होण्याच्या दिवशीच लागू होतो.
रेल्वेने ही प्रणाली तीन टप्प्यात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला टप्पा: 29 डिसेंबरपासून सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आधारशी जोडलेल्या खात्याशिवाय बुकिंग बंद करण्यात आली. दुसरा टप्पा: 5 जानेवारीपासून ही बंदी आता सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत लागू असेल. तिसरा टप्पा: 12 जानेवारीपासून लागू, त्यानंतर सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आधारशी जोडलेल्या अकाऊंटशिवाय तिकिटे बुक करता येणार नाहीत. रेल्वेने म्हटले आहे की, हा निर्णय बनावट ओळखपत्रे, सॉफ्टवेअर आणि तिकिटांच्या दलालांना आळा घालण्यासाठी आहे. सुरुवातीच्या दिवशी बहुतेक तिकिटे एजंट आणि बॉट्सद्वारे बुक करण्यात आली होती, ज्यामुळे सामान्य प्रवाशांची गैरसोय झाली. नवीन नियमानुसार सुरुवातीच्या वेळेत फक्त खऱ्या युजर्सलाच तिकिटे बुक करण्याची परवानगी असेल.
नव्या बदलांचा प्रवाशांना फायदा ?
भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या हितासाठी सातत्याने वेगवेगळे निर्णय घेतले जातात. अशा परिस्थितीत आता हे नवे नियम लागू केले गेले आहेत. नव्या नियमांचा उद्देश तिकीट बुकिंगची प्रक्रिया प्रवाशांसाठी अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि सोयीस्कर बनवणे हा आहे. आगाऊ बुकिंग कालावधी कमी केल्याने प्रवाशांना लवकर टिकीट मिळतील आणि ब्लॉक होण्याची समस्या कमी होईल. आरक्षित तिकीटांसाठी आधार तपासणी अनिवार्य असून फक्त आधार लिंक असलेल्या खात्यांना प्राधान्य मिळेल.






