Jalgaon To Pune New Railways : जळगावकरांसाठी गुडन्यूज!! सुरू होणार 3 नवीन रेल्वेगाड्या; कुठून कुठपर्यंत धावणार?

Published:
आजही पुण्याकडे जाण्यासाठी जळगावकर रेल्वेला पसंती दाखवतात. परंतु पुण्याला जाण्यासाठी फारच मर्यादित रेल्वे गाड्या उपलब्ध
Jalgaon To Pune New Railways : जळगावकरांसाठी गुडन्यूज!! सुरू होणार 3 नवीन रेल्वेगाड्या; कुठून कुठपर्यंत धावणार?

जळगाव मधून पुण्याला शिक्षण किंवा नोकरी निमित्त गेलेल्या लोकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. सध्याचा सणासुदीचा काळ बघता जळगाव वरून पुण्याला किंवा पुण्यावरून जळगावला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने जळगाव भुसावळ मार्गे तीन नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्याचा (Jalgaon To Pune New Railways) निर्णय घेतला आहे. पुणे – गोरखपूर, पुणे – नागपूर व पुणे – दानापूर अशा या 3 विशेष रेल्वे जळगाव वरून धावणार आहेत. रेल्वेच्या या निर्णयामुळे गर्दीच्या हंगामात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विमानसेवा मर्यादित

खरं तर अलीकडेच जळगाव – पुणे दरम्यान फ्लाय 91 या विमान कंपनीने नवीन विमानसेवा सुरू केली आहे. परंतु ही विमानसेवा आठवड्यातून काही दिवसच सुरु आहे. परिणामी आजही पुण्याकडे जाण्यासाठी जळगावकर रेल्वेला पसंती दाखवतात. परंतु पुण्याला जाण्यासाठी फारच मर्यादित रेल्वे गाड्या उपलब्ध आहेत. यापूर्वी भुसावळ-पुणे दरम्यान सुरू करण्यात आलेली हुतात्मा एक्स्प्रेस प्रवाशांसाठी खूपच सोयीची ठरली होती. मात्र, ती गाडी भुसावळऐवजी आता अमरावतीहून सोडण्यात येते. इतर बऱ्याच लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्या जळगावमार्गे पुणे जात असल्या, तरी त्यांना थांबा नाही. त्यामुळे आता 3 नवीन रेल्वे गाड्या जळगाव वरून सोडण्यात येणार आहेत. (Jalgaon To Pune New Railways)

कोणकोणत्या नवीन रेल्वे धावणार?? Jalgaon To Pune New Railways

1) पुणे – गोरखपूर स्पेशल ट्रेन

पुणे गोरखपूर स्पेशल ट्रेन 27 सप्टेंबर पासून ते 1 डिसेंबर पर्यंत चालवली जाणार असून या गाडीला भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ०१४१५ पुणे-गोरखपूर विशेष (६५ सेवा) रेल्वे गाडी दररोज पुणे येथून ०६.५० वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे दुसऱ्या दिवशी १६.०० वाजता पोहोचेल. तर ०१४१६ गोरखपूर-पुणे विशेष (६५ सेवा) रेल्वे गाडी दररोज गोरखपूर येथून १७.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे तिसऱ्या दिवशी ०३.१५ वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यांना भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

2) पुणे – नागपूर विशेष ट्रेन

पुणे नागपूर विशेष रेल्वेगाडी 27 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. ही स्पेशल गाडी 30 नोव्हेंबर पर्यंत धावेल. ही गाडी जळगाव, भुसावळ स्थानकावर थांबा घेईल.  ०१२०९ नागपूर -पुणे- नागपूर साप्ताहिक विशेष (२० फेऱ्या) रेल्वे गाडी २७ सप्टेंबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक शनिवारी  नागपूर येथून १९.४० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ११.२५ वाजता पोहोचेल. तर ०१२१० नागपूर- पुणे- नागपूर विशेष (१० सेवा) रेल्वे गाडी २८ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक रविवारी पुणे येथून १५.५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता पोहोचेल. दोन्ही ट्रेन ला जळगाव आणि भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. Jalgaon To Pune New Railways

3) पुणे – दानापूर स्पेशल ट्रेन –

०१४४९ पुणे- दानापूर -पुणे विशेष (१३४ सेवा) रेल्वे गाडी २५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत दररोज पुणे येथून १५.३० वाजता सुटेल आणि दानापूर येथे तिसऱ्या दिवशी ०२.०० वाजता पोहोचेल. ०१४५० पुणे-दानापूर-पुणे विशेष रेल्वे गाडी २७ सप्टेंबर ते दोन डिसेंबर या कालावधीत दररोज दानापूर येथून ०५.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १८.१५ वाजता पोहोचेल. या गाडीला भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.