मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा लाभ अद्याप महिलांना मिळालेला नाही. त्यामुळे हा लाभ कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. आता याबद्दलची मोठी अपडेट समोर आलेली आहे. त्यामुळे नेमके कोणते कोणत्या तारखेला पैसे येणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राज्य सरकारने गेल्यावर्षी सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्या कधी येणार या प्रतीक्षेत आता महिला आहेत. कारण सप्टेंबर महिना सुरू होऊन काही दिवस उलटले आहेत. दुसरीकडे ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे याच महिन्यात महिलांच्या खात्यावर येतील अशी देखील शक्यता एका बाजूला व्यक्त केली जात आहे.
ऑगस्ट महिन्याचे पैसे आठवडाभरात मिळणार?
ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट लाडक्या बहिणी पाहत आहेत. मात्र, ऑगस्ट महिना संपला तरी हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणीच्या नजरा लागल्या आहेत. सरकारकडून सहसा सणासुदीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात योजनेचा लाभ जमा केला जातो. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस गणेशोत्सवाला सुरुवात झाली. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा लाभ गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा केला जाईल अशी दाट शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, गणेश चतुर्थीला लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला नाही. त्यामुळे आता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा नाही.
हे ही वाचा
महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे येणार?
लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे सप्टेंबर महिन्यात दिले जाण्याची शक्यता आहे. मात्र, हे हप्ते एकत्र देणार की, दोन वेगवेगळ्या तारखांना दिले जाणार याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये. तसेच या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा सरकारकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे असे घडले तर लाडक्या बहिणींना खरंतर या निमित्ताने मोठा दिलासा मिळणार आहे.
अपात्र महिलांकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ
राज्यभरातील 1183 जिल्हा परिषद महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती महिला व बालविकास विभागाने सरकारला दिली. या कर्मचाऱ्यांवर नागरी सेवा नियमांतर्गत कार्यवाही करण्यासाठी सर्व जिल्हा परिषदेच्या सीईओंना आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे, बोगस माहिती देत लाडकी बहीण योजनेचे दरमहा 1500 रुपये घेणाऱ्या जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांवर आता कारवाईची टांगती तलवार आहे. लाभार्थी महिलांची स्क्रुटीनी होत असून दररोज नव्याने बोगस लाभ घेणारे लाभार्थी समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यातील तब्बल 26 लाख लाभार्थी बोगस असल्याचे समोर आले होते. त्यामुळे आता येणारे पैसे अपात्र महिलांना वगळूनच मिळतील असा अंदाज आहे.