Marathi News

लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; बहिणींची चिंता मिटली, नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Written by:Rohit Shinde
Published:
लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फलटणमध्ये महत्वपूर्ण विधान केले. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात अनेक दिवसांपासून असणारा संंशय कायमचा दूर होण्यास मदत होणार आहे.
लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; बहिणींची चिंता मिटली, नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जास्त दिवस सुरू राहणार नाही आणि लवकरच योजना बंद होईल अशा प्रकारची विधाने विरोधकांकडून करण्यात येत असतात. असे असतानाच योजनेचा हप्ता मिळण्यास गेल्या काही महिन्यांपासून उशिर होत आहे. तसेच केवायसी अनिवार्य केल्याने निकषात बसत नसल्याचं म्हणत योजनेतून अनेक महिलांना वगळण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना सुरू राहणार की बंद होणार? योजनेत आपले नाव कायम राहणार की नाव वगळणार? असे प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात उपस्थित होत आहेत. मात्र आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच या योजनेच्या भवितव्याबाबत महत्वपूर्ण विधान केले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळण्यास मोठी मदत होणार आहे,

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योनजेबाबत सर्वात मोठी घोषणा केली आहे. फलटण येथील एका कार्यक्रमात भाषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबात मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, “कुठल्याही परिस्थितीत आम्ही सुरू केलेल्या योजना या कधीच बंद होऊ देणार नाही. काही लोकं सांगतात, लाडकी बहीण योजना बंद होणार… मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत देवाभाऊ आहे, जोपर्यंत शिंदे साहेब आहे, अजितदादा आहेत… लाडकी बहीण योजना आम्ही कधीच बंद होऊ देणार नाही. आमच्या लाडक्या बहिणींना दिवाळीची भाऊबीज आहे ती सातत्याने मिळत राहील हा विश्वास मी देतो.” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ऑक्टोबर महिन्याचे १,५०० रू. कधी मिळणार?

. ऑक्टोबर महिना संपत आल्याने अद्याप तरी या महिन्याच्या हप्त्याबाबत कोणतेही घोषणा सरकारकडून करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.ऑक्टोबर महिन्यात दिवाळी असल्याने याच मुहूर्तावर पैसे मिळतील अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. त्यामुळे आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सुद्धा पुढील महिन्याच्या म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दोन ते तीन दिवसांत किंवा पहिल्या आठवड्याभरात लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यांचे पैसे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, या संदर्भात अद्याप सरकारकडून कोणतेही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews