Marathi News

लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी करण्यासाठी उरले अवघे काही दिवस; अन्यथा १,५०० रू. विसरा !

Written by:Rohit Shinde
Published:
लाडकी बहीण योजनेचे ई-केवायसी प्रक्रिया पार पाडण्यासाठी लाडक्या बहिणींच्या हातामध्ये आता अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत ई-केवायसी अपूर्ण राहिल्यास तुम्हाला तुमचे १,५०० रू. मिळणार नाहीत...
लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी करण्यासाठी उरले अवघे काही दिवस; अन्यथा १,५०० रू. विसरा !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. कारण, महिलांच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता महिलांना मिळत आहे. ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे सर्व पात्र महिलांचं लागलं होतं, त्यांना या निमित्तानं दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे ई-केवायसीची प्रोसेस पूर्ण करून घेण्यासाठी आता महिलांच्या हातामध्ये अवघे काही दिवस उरले आहेत.

ई-केवायसी ‘या’ तारखेच्या आधी पूर्ण करा!

लाडकी बहीण योजनेचा लाखो बोगस लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याचे अनेक प्रसंग समोर आले आहेत. त्यामुळे आता सरकारने योजनेच्या प्रत्येक निकषाची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. यासाठी सरकारने आणखी एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे. लाभार्थी महिलेला आता स्वत:सोबत वडिलांची किंवा पतीची देखील ई केवायसी करावी लागणार आहे. मात्र ही ई-केवायसीची प्रक्रिया 18 नोव्हेंबरच्या आधी पूर्ण करून घ्यावी लागणार आहे. त्यामुळे यामध्ये कोणतीही मुदतवाढ मिळण्याची चिन्हं सध्या दिसत नाहीत.

मंत्री आदिती तटकरेंचे महिलांना आवाहन

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियाच्या एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून माहिती दिली आहे. यामध्ये त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी मंत्रालयात बैठक घेतली. तसेच 18 सप्टेंबर 2025 पासून लाडकी बहिण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर ई केवायसी सुविधा उपलब्ध आहे. यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. आतापर्यंत बहुतांशी लाडकी बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र उर्वरित लाभार्थ्यांनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. असे मी आवाहन करते असे यावेळी तटकरे म्हणाल्या.

ई – केवायसी नसेल तर काय होणार ?

समोर येणाऱ्या माहितीनुसार, ई-केवायसी नसेल तरी या महिन्याचा हप्ता मिळणार आहे. मात्र पुढील महिन्यापासून महिलांच्या अडचणी वाढणार आहेत. “माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरचा आधी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.”

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews