MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप विरूद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी; राजकीय सामना निश्चित

Written by:Rohit Shinde
Published:
एक मोठी बातमी खरंतर समोर येताना दिसत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप एकमेकांच्या विरोधात लढणार हे जवळपास निश्चित असल्याची माहिती समोर येत आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप विरूद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी; राजकीय सामना निश्चित

महायुतीत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला खल अखेर संपून मुंबई महानगर पालिकेची निवडणूक महायुती एकत्रित लढणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्याचबरोबर राज्यातही काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा महायुतीकडून निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, स्वतंत्र लढले तरी निवडणुकीनंतर त्या-त्या ठिकाणी पुन्हा एकत्र येणार असं ठरल्याचीही सुत्रांची माहिती आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत, पुणे महापालिकेत नेमकं काय होणार, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. अशा एक मोठी बातमी खरंतर समोर येताना दिसत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप एकमेकांच्या विरोधात लढणार हे जवळपास निश्चित असल्याची माहिती समोर येत आहे.

पुणे आणि PCMC निवडणूक; भाजप Vs राष्ट्रवादी

राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या असून बहुतांश महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढवणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केले आहे. पण पुणे आणि पिंपरी -चिंचवड महापालिकांमध्ये भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे. अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. ते म्हणाले, पुणेआणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मध्ये दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढणे योग्य आहे. एकत्र लढल्यावर त्याचा फायदा विरोधकांना होऊ शकतो. म्हणून दोन्ही पक्ष आपापल्या ताकदीवर निवडणूक लढवणार आहे. मात्र ही लढत मैत्रीपूर्ण असेल. असे ही ते म्हणाले.  या वर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खूप सखोल विचार करूनच हे विधान केले असतील. गामी महापालिका निवडणुकांमध्ये पुणे आणि पिंपरी महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी आपण पूर्ण ताकद लावणार असे ते म्हणाले.

अजितदादांनी सत्तेसाठी कंबर कसली!

गेली अनेक दशके पिंपरी चिंचवड महापालिकेवर असलेली अजित पवारांची सत्ता हातून गेल्याने यंदाच्या पालिका निवडणुकीमध्ये, पराभवाची सल भरून काढण्यासाठी अजित पवार स्वतःच मैदानात उतरले आहेत . तर दुसरीकडे ,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष ठेवून आहेत .काही दिवसांपूर्वीच तटकरे यांनी खोपोलीमध्ये पिंपरीतील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आगामी निवडणुका राष्ट्रवादी स्वबळावर लढण्यासंदर्भात आखणी केल्याची माहिती  आता पदाधिकाऱ्यांकडून दिली गेली आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय गणितं खऱ्या अर्थाने बदलायला सुरुवात झाली होती. 2017 मध्येच राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये विलीन झाले. त्यामुळे आता होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी नव्या चेहऱ्यांना संधी देईल का आणि ते चेहरे मतदार स्वीकारतील का याकडे सर्वांच लक्ष आहे.