सिडनीच्या बोंडी बीचवर झालेल्या हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन संशयितांपैकी एक भारतीय नागरिक असल्याचे पोलिसांनी आता उघड केले आहे. तेलंगणा पोलिसांनी सांगितले की, बोंडी हल्ल्यात संशयितांपैकी एक अक्रम याला गोळ्या घालून ठार मारण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा माणूस मूळचा हैदराबादचा रहिवासी होता आणि जवळजवळ तीन दशकांपासून ऑस्ट्रेलियात राहत होता. त्यामुळे आता या गंभीर घटनेनंतर हा एक मोठा आणि धक्कादायक खुलासा आता समोर आला आहे.
बाँडी बिचवर नेमकं काय घडलं ?
ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरालगतच्या बॉन्डी समुद्रकिनाऱ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 16 जणांचा मृत्यू झाला. तर 42 जण जखमी झाले. बॉन्डी समुद्रकिनाऱ्यावर ज्यू नागरिक सण साजरा करत असताना दोन हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. घटनेनंतर समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि पळापळ सुरु झाली. मात्र काही वेळानं पोलिसांनी एका हल्लेखोराला गोळ्या घातल्या. तर दुसरा हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात आहे. ज्यू समुदायाला लक्ष्य करण्यात आल्यानं स्थानिक ज्यू बोर्डानं नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं. ज्यू समुदायाचे नेतेही पोलिसांशी संपर्क साधून आहेत.
या दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगार वडील आणि मुलगा होते, त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. ऑस्ट्रेलियन तपास संस्थांनी आरोपींची पार्श्वभूमी तपासणी सुरू केली आहे. हल्लेखोरांची ओळख वडील आणि मुलगा म्हणून झाली आहे. 50 वर्षीय वडिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांच्या 24 वर्षीय मुलाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा माणूस मूळचा हैदराबादचा रहिवासी होता आणि जवळजवळ तीन दशकांपासून ऑस्ट्रेलियात राहत होता. तरीही त्याने आपले भारतीय नागरिकत्व कायम ठेवले. ऑस्ट्रेलियन अधिकारी पिता-पुत्र हल्लेखोरांची पार्श्वभूमी तपासणी करत असताना याची पुष्टी झाली.
बंदुकींचे कायदे अधिक कडक करणार
या हल्ल्यानंतर, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज म्हणाले की त्यांच्या मंत्रिमंडळाने बंदूक कायदे कडक करण्यास आणि बंदूक परवान्यावर परवानगी असलेल्या शस्त्रांची संख्या आणि त्याचा वैधता कालावधी यासारख्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय बंदुक नोंदणीवर काम करण्यास सहमती दर्शविली आहे.
तर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग यांच्याशी चर्चा केली आणि दहशतवादी हल्ल्याबद्दल ऑस्ट्रेलियाला शोक व्यक्त केला आणि पूर्ण पाठिंबा दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साजिदकडे 2015 पासून बंदुकीचा परवाना होता, तो एका गन क्लबचा सदस्य होता आणि त्याच्याकडे सहा नोंदणीकृत शस्त्रे होती. गोळीबारात ही परवानाकृत शस्त्रे वापरली गेली.





