MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

मुंबई महापालिका निवडणूक; ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रचाराची धुरा आदित्य ठाकरेंच्या हाती !

Written by:Rohit Shinde
Published:
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आदित्य ठाकरे यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मुंबई महापालिका निवडणूक; ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रचाराची धुरा आदित्य ठाकरेंच्या हाती !

मुंबई-ठाण्यासह राज्यातील प्रलंबित 29 महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत याबाबत मोठी घोषणा केली होती. त्यानुसार, 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान पार पडणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2026 ला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. राज्यातील 29 महापालिकांसाठी 3 कोटी 48 लाख मतदार मतदान करणार आहेत. या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महापालिका निवडणुकीसाठी वेगळीच रणनिती आखल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आदित्य ठाकरे यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आदित्य ठाकरेंच्या खांद्यावर प्रचाराची धुरा

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आदित्य ठाकरे यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. निवडणूक प्रचाराची संपूर्ण धुरा आदित्य ठाकरे सांभाळणार असून, प्रचार नियोजन, विविध मेळावे, सभा आणि संवाद कार्यक्रमांची आखणी त्यांच्याकडून केली जाणार आहे. विशेषतः मुंबईतील युवा मतदारांवर लक्ष केंद्रित करत, त्यांच्या प्रश्नांना, अपेक्षांना आणि शहराशी संबंधित मुद्द्यांना प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवण्यावर भर दिला जाणार आहे.

युवा रोजगार, शिक्षण, पर्यावरण, सार्वजनिक वाहतूक, घरांची समस्या, आरोग्य आणि डिजिटल सुविधा अशा विषयांवर आधारित प्रचार रणनीती आखण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. सोशल मीडियाचा प्रभावी वापर, थेट संवाद आणि आधुनिक प्रचार पद्धतींच्या माध्यमातून तरुण मतदारांना शिवसेनेकडे वळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. एकीकडे महायुतीची ताकद आणि दुसरीकडे ठाकरे बंधूंचं एकत्र येणं, यामुळे मुंबई महापालिका निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची लक्षणे दिसत आहेत. आगामी काही दिवसांत उमेदवारांची घोषणा आणि प्रचाराचा जोर वाढल्यानंतर मुंबईतील राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

महापालिका निवडणूक महत्वाच्या तारखा

अर्ज स्वीकारणे – २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५

अर्जाची छाननी – ३१ डिसेंबर २०२५

उमेदवार माघारीची मुदत – २ जानेवारी २०२६

चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवाराची यादी – ३ जानेवारी २०२६

मतदानाची तारीख – १५ जानेवारी २०२६

मतमोजणी तारीख – १६ जानेवारी २०२६

त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केल्याचे चित्र सध्या राज्यभरात पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत मुंबई महापालिकेतील आपली ताकद आणि संख्याबळ वाढविण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने मात्र चांगलीच कंबर कसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.