Benefits of eating oats in winter: आजकाल अनेकजण नाश्त्यात आणि आहारात हेल्दी पदार्थ खाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ते विवीध पौष्टिक पदार्थ शोधत असतात. ओट्स हा असाच एक नाश्त्यासाठी हेल्दी पर्याय आहे. अनेक आहारतज्ज्ञ वजन कमी करण्यासाठी आहारात ओट्स चा समावेश करण्याचा सल्ला देतात.
ओट्समध्ये प्रोटीन आणि फायबर मोठ्या प्रमाणत असते. त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. याच्या नियमित सेवनाने बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनसारख्या समस्या दूर होतात. उन्हाळ्याप्रमाणेच हिवाळ्यातसुद्धा ओट्स खाण्याचे अनेक फायदे आहेत. आज आपण या पदार्थांबाबत जाणून घेऊया….
रक्तातील साखर नियंत्रित राहते-
ओट्सचा ग्लायसेमिक इंडेक्स अतिशय कमी असतो. त्यामुळे डायबिटीस रुग्ण याचे सेवन करू शकतात. शिवाय यातील सॉल्युबल गुणधर्म रक्तातील साखर वाढण्यापासून रोखतात. त्यामुळे हे डायबिटीसमध्ये खाणे हेल्दी आहे.
पचनक्रिया सुधारते-
ओट्समध्ये सॉल्युबल फायबर गुणधर्म मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे आतड्यांमधील घाण सहज बाहेर पडण्यास मदत होते. अशाने अपचन, बद्धकोष्ठता आणि गॅससारख्या समस्या दूर होतात.
हृदय निरोगी राहते-
ओट्स खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. ओट्समध्ये अँटी ऑक्सीडेंट मोठ्या प्रमाणत असतात. त्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते. अँटी ऑक्सीडेंट गुणधर्म शरीरातील सूज कमी करतात आणि ब्लड सर्क्युलेशन सुरळीत करण्यास मदत करतात.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते-
ओट्समध्ये विविध प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. अशाने अनेक आजार दूर राहतात.
वजन कमी करण्यास मदत-
ओट्समध्ये फायबर मोठ्या प्रमाणत असते. त्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते. अशाने हिवाळ्यात सतत भूक लागत नाही. त्यामुळे वजन नियंत्रित करण्यास मदत मिळते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





