Home remedies for period pain: महिलांचे शरीराची प्रक्रिया पुरुषांच्या शरीरापेक्षा फार वेगळी असते. कारण महिलांना प्रत्येक महिन्याला मासिक पाळीच्या वेदना सहन कराव्या लागतात. मासिक पाळीमध्ये प्रत्येक महिलेच्या शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. अनेकांना पोटदुखी, पाठदुखी होते तर काहींना चीडचीड, राग येत असतो.
अनेक महिलांच्या पोटात आणि कंबरेत इतक्या वेदना होतात की, त्यांना चालणे-फिरणे कठीण होते. अशावेळी अनेकजण पेन किलर औषधे घेतात. पण त्याऐवजी घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय करने जास्त फायदेशीर असते. आज आपण मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी जास्वंदच्या फुलाच्या चहाचे फायदे जाणून घेऊया….
जास्वंदीच्या फुलाचे फायदे-
हार्मोनल असंतुलनात मदत-
जास्वंदचे फुल महिलांच्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत करते. हार्मोनल संतुलन राहिल्याने मासिक पाळीमध्ये चिडचिड आणि राग येत नाही. त्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते.
मासिक पाळीच्या वेदनापासून आराम-
मासिक पाळीत पोटामध्ये गोळे येणे आणि वेदना होत असतील तर जास्वंदचा चहा पिणे फायदेशीर आहे. जास्वंदमध्ये अँटी इन्फ्लीमेंट्री आणि अँटी स्पॅस्मोडिक गुणधर्म असतात. त्यामुळे पोटाच्या मसल्समधील सूज कमी होण्यास मदत होते. तसेच पोटाच्या वेदना कमी होतात.
जास्त रक्तस्त्राव थांबवते-
अनेक महिलांना मासिक पाळीदरम्यान फारच जास्त रक्तस्त्राव होत असतो. त्यामुळे पोटात प्रचंड वेदना होतात. अशावेळी जास्वंदचा चहा पिल्याने त्यातील अँटी स्पॅस्मोडिक गुणधर्म ब्लड सर्क्युलेशन नियंत्रित करतात. आणि अतिरिक्त रक्तस्त्राव रोखण्यास मदत करतात.
ताणतणाव दूर करते-
मासिक पाळीमध्ये ताणतणाव येणे अतिशय सामान्य गोष्ट आहे. मासिक पाळीमध्ये जास्वंदच्या फुलाचा चहा पिल्याने मेंदू शांत होण्यास मदत होते. त्यामुळे ताणतणाव दूर होऊन मानसिक आराम मिळतो.
पचनक्रिया सुधारते-
काही महिलांना मासिक पाळीदरम्यान पोटफुगी आणि ऍसिडिटीची समस्या होते. त्यामुळे त्यांच्या पोटात प्रचंड वेदना होतात. अशावेळी जास्वंदचा चहा पिल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोट साफ होण्यास मदत होते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





