Remedies to relieve knee pain: आजकाल बदलेली जीवनशैली आणि चुकीच्या आहाराच्या पद्धतींमुळे विविध शारीरिक समस्या दिसून येत आहेत. हळूहळू शरीरात विविध बदल होऊन आजार जडत आहेत. त्यातीलच एक आजार म्हणजे गुडघेदुखी होय. अशातच गुडघ्यांमधील ग्रीस कमी होऊन कटकट असा आवाज येणे, गुडघेदुखी आणि सांधेदुखीच्या समस्या त्रास देत आहेत. त्यामुळे लोकांना चालणे-फिरणे कठीण होत आहे.
बहुतेक लोक हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन सीचा आहार घेण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे शरीरात कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन सी कमी होऊन हाडांच्या आणि सांध्याच्या समस्या उद्भवतात. अनेकांना गुडघ्यांमधून कटकट आवाज येण्याची समस्या त्रास देते. हे गुडघ्यांमधील ग्रीस कमी झाल्याने होते. आज आपण असे काही पदार्थ पाहूया जे गुडघ्यांमधील ग्रीस वाढवण्यास मदत करतील……
अळशीच्या बिया-
आजकाल अनेकजण अळशीच्या बियांचे सेवन करत आहेत. या बिया वजन कमी करण्यासोबतच अनेक फायदे देतात. अळशीच्या बिया ओमेगा३ फॅटी ऍसिडने समृद्ध असतात. त्यामुळे यांचे सेवन केल्याने सांध्यामधील ग्रीस आणि लवचिकता वाढते.
जांभूळ आणि चेरी-
जांभूळ आणि चेरीसारखी फळे सांध्याच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. या फळांमध्ये अँथोसायनिन्स नावाचे एक संयुग असते. जे सांध्यातील लवचिकता टिकवून ठेवण्यास मदत करते. त्यामुळे गुडघेदुखी आणि सूजसारख्या समस्या दूर होतात.
हळद-
हळद हा अत्यंत औषधीय गुणर्धम असलेला मसाला आहे. हळदीमध्ये करक्युमिन नावाचे महत्वाचे संयुग असते. त्यामध्ये अँटी इन्फ्लीमेंट्री गुणधर्म असतात. त्यामुळे सांध्यातील सूज आणि जळजळ दूर होऊन लवचिकता आणि तेलकटपणा येण्यास मदत मिळते.
दही आणि ताक-
दही आणि ताक हे एक नैसर्गिक प्रोबायोटिक्स असतात. या पदार्थांच्या सेवनाने हाडे आणि सांधे मजबूत होतात. सांध्यातील लवचिकता वाढते. त्यामुळे हे पदार्थ आहारात समाविष्ट केल्याने गुडघ्यामधील कटकट आवाज दूर होण्यास मदत होते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





