What to eat on an empty stomach in the morning: आजकाल निरोगी जीवनशैली ही कठीण गोष्ट बनली आहे. वाढलेल्या कामाच्या व्यापामुळे आणि बदलेल्या आहार पद्धतींमुळे विविध आरोग्य समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे बहुतेक लोक आपल्या दिनचर्येत छोटे-छोटे बदल करत आहेत. या बदलाची सुरुवात निरोगी पदार्थ खाण्यापिण्यापासून करत आहेत.
निरोगी राहण्यासाठी सकाळची सुरुवात योग्य करणे आवश्यक आहे. कारण आपण उठल्याबरोबर जे खातोपितो त्याचा परिणाम दिवसभर आपल्याला जाणवत राहतो. आज आपण असेच काही हेल्दी ड्रिंक पाहणार आहोत, जे सकाळी उपाशी पोटी घेतल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होईल…..
लिंबू पाणी-
लिंबू पाणी हे चमत्कारिक ड्रिंक आहे. शरीरासाठी लिंबू पाण्याचे अनेक फायदे आहेत. या ड्रिंकमुळे फक्त शरीर हायड्रेटेड होत नाही तर ऊर्जादेखील मिळते. लिंबूमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि तुम्हाला एनर्जेटिक ठेवायला मदत करते. शिवाय सकाळी उपाशी पोटी पिल्याने शरीरातील सर्व घाण निघून डिटॉक्स व्हायला मदत होते.
जिरे पाणी-
अनेकांना सकाळी-सकाळी शौचास साफ होत नाही. त्यामुळे पोटफुगी, ऍसिडिटी आणि गॅससारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे संपूर्ण दिवस खराब जातो. शिवाय तुमच्या आरोग्यावरही परिणाम होतो. पण सकाळी जिरे पाणी पिल्याने पचनाच्या सर्व समस्या दूर होऊन पोट साफ होण्यास मदत होते. तसेच चरबी कमी होण्यासही मदत होते.
आले आणि मधाचे पाणी-
आले आणि मध मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे तुमची मंदावलेली पचनक्रिया सुरळीत होते. तसेच हे दोन्ही पदार्थ तुम्हाला मॉर्निंग एनर्जी देण्यात फायदेशीर आहेत. यामुळे दिवसभर तुम्हाला ताजेतवाने वाटेल.
फळांचा रस-
सकाळी फळांचा रस घेणेसुद्धा फायदेशीर असते. फळांमध्ये असलेल्या नैसर्गिक गोडव्याने तुम्हाला इन्स्टंट एनर्जी मिळण्यास मदत होते. शिवाय तुम्हाला अनहेल्दी खाण्याची इच्छा कमी होते.
ग्रीन टी-
आजकाल अनेकजण वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी चहाऐवजी ग्रीन टीचा वापर करत आहेत. ग्रीन टी अँटीऑक्सीडेन्टने समृद्ध असते. त्यामुळे फ्री रॅडिकल्सपासून शरीराला वाचवते. शिवाय त्यात कॅफिन अत्यंत कमी प्रमाणात असते. जे शरीराची ऊर्जा वाढवण्यात मदत करते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





