How to satisfy sweet cravings in diabetes: जवळपास प्रत्येकालाच गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. अनेकांना गोड पदार्थ इतके आवडतात की, ते आपल्या प्रत्येक जेवणानंतर एखादी स्वीट डिश किंवा मिठाई नक्की खातात. परंतु आजकाल बिघडलेली जीवनशैली आणि आहारामुळे अनेकजण डायबिटीसने ग्रस्त आहेत. डायबिटीसची समस्या वाढल्याने गोड खाणेसुद्धा बंद होते. त्यामुळे अनेकांना जेवण नकोसे वाटते.
डायबिटीस हा असा आजार आहे जो फक्त योग्य आहार आणि निरोगी जीवनशैलीने नियंत्रित केला जाऊ शकतो. त्यामुळे डायबिटीसच्या रुग्णांना आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागते. कारण विचार न करता कोणतेही पदार्थ खाल्ल्यास रक्तातील साखर वेगाने वाढू शकते. त्यामुळे गोड पदार्थ तर अजिबातच खाता येत नाहीत. अशावेळी काही पदार्थ तुमची गोड खाण्याची इच्छा पूर्ण करू शकतात. आज आपण डायबिटीसमध्ये गोड खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक साखर कोणती त्याबाबत जाणून घेऊया…..
कच्चे मध-
अनेकांना माहिती नसेल परंतु, बाजारात उपलब्ध असणाऱ्या प्रक्रिया केलेल्या मधापेक्षा, कच्चे मध जास्त फायदेशीर असते. कच्चे मध वजन वाढण्यापासून रोखते. त्यामुळे डायबिटीसच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर असते.
डेट्स शुगर-
डायबिटीसमध्ये गोड खाण्याची इच्छा भागवण्यासाठी डेट्स शुगर अर्थातच खजुरांपासून बनवलेली साखर अतिशय उपयुक्त आहे. यामुळे रक्तातील साखर वाढत नाही. तुम्ही चहा कॉफीमध्ये गोडवा आणण्यासाठी डेट्स शुगर वापरू शकता. शिवाय पुडिंग, केकमध्येही हे घालून सेवन करू शकता.
कोकोनट शुगर-
नारळाच्या झाडापासून मिळणारी त्याच्या गोड रसापासून बनणारी ही एक नैसर्गिक साखर आहे. याला रिफाईंड केले जात नाही. त्यामुळे ती डायबिटीसच्या रुग्णांसाठी फायदेशीर असते.
खडीसाखर-
डायबिटीसमध्ये तुम्ही खडीसाखर खाऊ शकता. कारण ती साखरेप्रमाणे रिफाईंड नसते. त्यामध्ये कॅल्शिअम आणि मिनरल्स चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे अनरिफाईंड खडीसाखर एक चांगला पर्याय आहे.
स्टीव्हिया-
ग्लायसेमिक इंडेक्स फ्री स्टीव्हिया डायबिटीसमध्ये साखरेसारखा हानिकारक नसतो. त्यामुळे डायबिटीससाठी स्टीव्हिया साखरेचा एक चांगला पर्याय आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





