Rakhi Sawant Slam Nitish Kumar: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी सर्वांसमोर एका डॉक्टर मुस्लीम महिलेचा बुरखा ओढला. 15 डिसेंबर रोजी, जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार आयुष डॉक्टरांना नियुक्ती पत्रे देत होते, तेव्हा त्यांनी त्यापैकी एका नुसरत नावाच्या महिला डॉक्टरचा बुरखा ओढला. नितीश कुमार यांच्या या अजब वर्तुणुकीवरून संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. सर्व स्तरातून नितीश कुमार यांच्यावर टीकेची जोड उठवली गेली. आता या प्रकरणात बॉलीवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणाऱ्या राखी सावंतने उडी घेतली आहे.
काय म्हणाली राखी सावंत? Rakhi Sawant Slam Nitish Kumar
नमस्कार नितीश कुमारजी. चरण स्पर्श. तुमचा हात आशीर्वादासाठी कायम माझ्या डोक्यावर असू देत. मी तुमचा आदर करते, तुमच्यावर प्रेम करते. तुम्ही खूप चांगले नेते आहात. पण, तुम्ही हे काय करून बसलात नितीशजी? तुम्ही हे काय केलं? एका मुस्लिम महिलेला तुम्ही बोलवून पुरस्कार देत आहात, तिला सन्मानित करत आहात, तिला आदर देताय पण तुम्हाला पाच पैशाचं ज्ञान नाही की मुस्लिम धर्मात एखादी महिला बुरखा घालून जेव्हा जाते तेव्हा तिच्या नकाबला कुणी हात लावू शकत नाही.
नितीशकुमार, इतके दिग्गज नेते आहात तुम्ही. मी तुमचा आदर करते. परंतु तुम्ही हे काय करून बसलात? तुम्ही एका महिलेचा, एका मुस्लिम महिलेचा नकाब ओढताय. किती चुकीची गोष्ट आहे ही नितीशजी. जर मी तुमच्यापाशी आले आणि सगळ्यांसमोर तुमचं धोतर खेचलं, तुमच्या पॅन्टचा नाडा ओढला तर चालेल का? तुम्ही एका महिलेला इज्जत देता आणि लगेच तिची इज्जत काढून घेता. तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्ही माझे आवडते नेते आहात. पण तुम्ही काय वागून बसलात मुस्लिम महिलेसोबत. ही चुकीची गोष्ट आहे. Rakhi Sawant Slam Nitish Kumar
माफी मागा नितीश कुमार जी
राखी सावंत पुढे म्हणाली, नीतीश जी, तुम्ही त्या महिलेची माफी मागितली पाहिजे. मीडियासमोर त्या महिलेला बहिणीच्या नात्याने बोलवून तिची माफी मागा. मी तुमचा आदर करते. मी यूपी बिहारचाही आदर करते. पण एखादा महिलेसोबत होणारा अत्याचार अन्याय, खास करून तिच्या बुरख्यासोबत केली जाणारी छेडछाड मी कदापि सहन करणार नाही. तुम्ही आधी माफी मागा असं म्हणत राखी सावंतने नितीश कुमार यांच्यावर टीकेची जोड उठवली.





