बुध प्रदोष व्रत हे भगवान शिव-पार्वतीला समर्पित असून, बुधवारी येणाऱ्या त्रयोदशीला हे व्रत करतात, ज्यामुळे आरोग्य, सुख, समृद्धी मिळते, पापांचा नाश होतो आणि व्यवसायात यश येते.
बुध प्रदोष व्रताचे महत्त्व
बुध ग्रह बुद्धी, वाणी आणि व्यापाराचा कारक असल्याने, हे व्रत विद्यार्थ्यांसाठी, नोकरी करणाऱ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे निर्णय घेण्यातील गोंधळ दूर होतो आणि कामात यश मिळते. हे व्रत केल्याने भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात, ज्यामुळे आनंद, शांती आणि समृद्धी मिळते. सर्व पापांचा नाश होतो आणि आत्म्याची शुद्धी होते. हे व्रत शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करते, तसेच कुटुंबात सुख-समृद्धी आणते. बुध प्रदोष व्रत हे भगवान शिव-पार्वतीला समर्पित असून, बुधवारी येणाऱ्या त्रयोदशीला हे व्रत करतात; याचे महत्त्व म्हणजे यामुळे बुद्धी, करिअर आणि आर्थिक समृद्धी मिळते, आरोग्य सुधारते, पापांचा नाश होतो.
बुध प्रदोष व्रत कथा
प्राचीन काळी एका व्यक्तीचं नुकतंच लग्न झालं होतं. तो आपल्या पत्नीला दुसऱ्यांदा घेण्यासाठी तिच्या माहेरी गेला आणि सासूला म्हणाला, तो बुधवारीच आपल्या पत्नीला घेऊन परत जाईल. मात्र, त्याला सासू-सासऱ्यांनी विरोध केला. बुधवारी मुलीला निरोप दिला जात नाही. बुधवारचा दिवश अशुभ आहे, असेही सांगितले. पण तो सहमत झाला नाही.
अखेर व्यक्तीच्या सासू-सासऱ्यांनी आपल्या मुलीला निरोप दिला. पती-पत्नी बैलगाडीतून निघाले असता एका शहराबाहेर आल्यावर व्यक्तीच्या पत्नीला तहान लागली. व्यक्ती एका भांड्यात पाणी आणण्यासाठी गेला. तो पाणी घेऊन परत आला तेव्हा त्याची पत्नी परपुरुषाने आणलेले पाणी पीत होती. इतकंच नाही तर त्याच्यासोबत हसून बोलत होती. हे पाहून व्यक्तीला खूप राग आला. पण, त्याला हेही आश्चर्य वाटलं, की तो परपुरुष हुबेहूब त्याच्यासारखाच दिसत होता. रागाच्या भरात तो त्या व्यक्तीसोबत भांडू लागला. दोघांचं भांडण पाहून तिथे लोकांची गर्दी जमली. त्यात एक शिपाईही होता.
शिपायानं त्या महिलेला विचारलं, की या दोघांपैकी तुझा पती कोण आहे? तेव्हा ती बिचारी गोंधळून गेली. कारण दोघेही अगदी सारखे दिसत होते. पत्नीला अशा संकटात सापडल्याचं पाहून तिच्या पतीच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानं भगवान शंकराकडे प्रार्थना केली, ‘हे देवा, माझ्या पत्नीचं रक्षण कर. माझ्याकडून मोठी चूक झाली. मी बुधवारी पत्नीला घेऊन निघालो. भविष्यात मी अशी चूक कधीही करणार नाही.’ व्यक्तीची प्रार्थना पूर्ण होताच तो दुसरा पुरुष अचानक अदृश्य झाला आणि तो पुरुष आपल्या पत्नीसोबत सुखरूप घरी पोहोचला. त्या दिवसापासून त्या पती-पत्नीने बुध त्रयोदशीला ‘प्रदोष व्रत’ सुरू केले आणि पुढील आयुष्य आनंदाने व्यतीत केले.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)