Marathi News

Pradosh Vrat 2025 : बुध प्रदोष व्रत! महादेवाची पूजा करणाऱ्यांना आज मिळणार विशेष फळ, वाचा संपूर्ण शिव चालीसा

Published:
बुधवारी येणाऱ्या प्रदोषाला बुध प्रदोष म्हणतात. यात भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते आणि बुधाचे उपाय करणेही शुभ मानले जाते.
Pradosh Vrat 2025 : बुध प्रदोष व्रत! महादेवाची पूजा करणाऱ्यांना आज मिळणार विशेष फळ, वाचा संपूर्ण शिव चालीसा

आज बुधवार 17 डिसेंबर रोजी बुध प्रदोष व्रत पाळले जाणार आहे. बुध प्रदोष व्रत हे भगवान शिव-पार्वतीला समर्पित असून, हे व्रत केल्याने पापक्षय, मनोकामनापूर्ती, आरोग्य, सुख-समृद्धी मिळते. हे व्रत विशेषतः बुधवारी आल्याने गणपतीची कृपाही मिळते.

बुध प्रदोष व्रताचे महत्त्व

बुध प्रदोष या दिवशी शिव-पार्वतीची पूजा केल्याने पापांचा नाश होतो, आरोग्य सुधारते, धन-समृद्धी येते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते; यासाठी प्रदोष काळात (सूर्यास्तापूर्वी आणि नंतरचा सुमारे १ तास १२ मिनिटांचा काळ) शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र, मध, दही अर्पण करून शिव चालीसा पठण करणे, ‘ॐ नमः शिवाय’ मंत्र जपणे आणि सात्विक राहणे महत्त्वाचे आहे, ज्यामुळे विशेषतः बुधवारी हे व्रत अधिक फलदायी ठरते.

बुध प्रदोष व्रत आणि शिव चालीसा

बुधवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला विशेष महत्व आहे. हे व्रत ठेवल्याने संतती सुख, धन-धान्य आणि मानसिक शांती मिळते, असे मानले जाते. यामुळे जीवनातील सर्व अडथळे दूर होतात, अशी श्रद्धा आहे. या दिवशी ‘शिव चालीसा’ किंवा ‘लिंगाष्टक’ सारख्या स्तोत्रांचे पठण करणे अत्यंत फलदायी मानले जाते.

शिव चालीसा

।।दोहा।।
श्री गणेश गिरिजा सुवन, मंगल मूल सुजान।
कहत अयोध्यादास तुम, देहु अभय वरदान॥
जय गिरिजा पति दीन दयाला। सदा करत सन्तन प्रतिपाला॥
भाल चन्द्रमा सोहत नीके। कानन कुण्डल नागफनी के॥
अंग गौर शिर गंग बहाये। मुण्डमाल तन छार लगाये॥
वस्त्र खाल बाघम्बर सोहे। छवि को देख नाग मुनि मोहे॥
मैना मातु की ह्वै दुलारी। बाम अंग सोहत छवि न्यारी॥
कर त्रिशूल सोहत छवि भारी। करत सदा शत्रुन क्षयकारी॥
नन्दि गणेश सोहै तहँ कैसे। सागर मध्य कमल हैं जैसे॥
कार्तिक श्याम और गणराऊ। या छवि को कहि जात न काऊ॥
देवन जबहीं जाय पुकारा। तब ही दुख प्रभु आप निवारा॥
किया उपद्रव तारक भारी। देवन सब मिलि तुमहिं जुहारी॥
तुरत षडानन आप पठायउ। लवनिमेष महँ मारि गिरायउ॥
आप जलंधर असुर संहारा। सुयश तुम्हार विदित संसारा॥
त्रिपुरासुर सन युद्ध मचाई। सबहिं कृपा कर लीन बचाई॥
किया तपहिं भागीरथ भारी। पुरब प्रतिज्ञा तसु पुरारी॥
दानिन महं तुम सम कोउ नाहीं। सेवक स्तुति करत सदाहीं॥
वेद नाम महिमा तव गाई। अकथ अनादि भेद नहिं पाई॥
प्रगट उदधि मंथन में ज्वाला। जरे सुरासुर भये विहाला॥
कीन्ह दया तहँ करी सहाई। नीलकण्ठ तब नाम कहाई॥
पूजन रामचंद्र जब कीन्हा। जीत के लंक विभीषण दीन्हा॥
सहस कमल में हो रहे धारी। कीन्ह परीक्षा तबहिं पुरारी॥
एक कमल प्रभु राखेउ जोई। कमल नयन पूजन चहं सोई॥
कठिन भक्ति देखी प्रभु शंकर। भये प्रसन्न दिए इच्छित वर॥
जय जय जय अनंत अविनाशी। करत कृपा सब के घटवासी॥
दुष्ट सकल नित मोहि सतावै । भ्रमत रहे मोहि चैन न आवै॥
त्राहि त्राहि मैं नाथ पुकारो। यहि अवसर मोहि आन उबारो॥
लै त्रिशूल शत्रुन को मारो। संकट से मोहि आन उबारो॥
मातु पिता भ्राता सब कोई। संकट में पूछत नहिं कोई॥
स्वामी एक है आस तुम्हारी। आय हरहु अब संकट भारी॥
धन निर्धन को देत सदाहीं। जो कोई जांचे वो फल पाहीं॥
अस्तुति केहि विधि करौं तुम्हारी। क्षमहु नाथ अब चूक हमारी॥
शंकर हो संकट के नाशन। मंगल कारण विघ्न विनाशन॥
योगी यति मुनि ध्यान लगावैं। नारद शारद शीश नवावैं॥
नमो नमो जय नमो शिवाय। सुर ब्रह्मादिक पार न पाय॥
जो यह पाठ करे मन लाई। ता पार होत है शम्भु सहाई॥
ॠनिया जो कोई हो अधिकारी। पाठ करे सो पावन हारी॥
पुत्र हीन कर इच्छा कोई। निश्चय शिव प्रसाद तेहि होई॥
पण्डित त्रयोदशी को लावे। ध्यान पूर्वक होम करावे ॥
त्रयोदशी ब्रत करे हमेशा। तन नहीं ताके रहे कलेशा॥
धूप दीप नैवेद्य चढ़ावे। शंकर सम्मुख पाठ सुनावे॥
जन्म जन्म के पाप नसावे। अन्तवास शिवपुर में पावे॥
कहे अयोध्या आस तुम्हारी। जानि सकल दुःख हरहु हमारी॥
॥दोहा॥
नित्त नेम कर प्रातः ही, पाठ करौं चालीसा।
तुम मेरी मनोकामना, पूर्ण करो जगदीश॥
मगसर छठि हेमन्त ॠतु, संवत चौसठ जान।
अस्तुति चालीसा शिवहि, पूर्ण कीन कल्याण॥
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews