MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

मोठी बातमी ! आता लाडक्या बहिणींना थेट 4,500/- मिळणार? पण कधी अन् कारण काय?

Written by:Rohit Shinde
Published:
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचारसंहितांमुळे लाडक्या बहिणींचा 1500 रूपयांचा हप्ता चांगलाच लांबणीवर पडला आहे. त्यामध्ये आता महापालिका निवडणूक आचारसंहितेमुळे भर पडली आहे.
मोठी बातमी ! आता लाडक्या बहिणींना थेट 4,500/- मिळणार? पण कधी अन् कारण काय?

लाडक्या बहिणींचा नोव्हेंबर महिन्याचा 1500 रूपयांचा हप्ता डिसेंबर महिना संपत आला तरी अद्याप मिळालेला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचारसंहितांमुळे लाडक्या बहिणींचा 1500 रूपयांचा हप्ता चांगलाच लांबणीवर पडला आहे. त्यामध्ये आता महापालिका निवडणूक आचारसंहितेमुळे भर पडली आहे. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर अन् जानेवारी महिन्याच्या हप्त्याबाबत आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दुसरीकडे लेट पण थेट असा महिलांना एकावेळी 4,500 रूपयांचा लाभ दिला जाईल, असं देखील सांगितलं जात आहे. पण हा लाभ कधी मिळेल? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

लाडक्या बहिणींना थेट 4,500/- मिळणार?

राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे नोव्हेंबरचा हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या 4 तारखेनंतर मिळण्याची शक्यता होती. मात्र, राज्यातील काही नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 21 डिसेंबर रोजी मतमोजणी जाहीर झाली. त्यामुळे 22 तारखेनंतर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबरचा हप्ता मिळण्याची दाट शक्यता होती. पण आता निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे.

महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आता लाडक्या बहिणींना तुर्तास तरी योजनेचे पैसे मिळणार नाहीयेत. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. त्यामुळे लाडक्या बहिणींना 17 जानेवारीनंतर योजनेचा लाभ मिळणार आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे भर पडली आहे. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर अन् जानेवारी महिन्याच्या हप्त्याबाबत आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दुसरीकडे लेट पण थेट असा महिलांना एकावेळी 4,500 रूपयांचा लाभ दिला जाईल, असं देखील सांगितलं जात आहे.

e-KYC / दुरूस्तीसाठी 31 डिसेंबरची मुदत

ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. आतापर्यंत अनेक महिलांनी आपली ई-केवायसी पूर्ण केली आहे. मात्र, ई-केवायसी करताना काहींनी चुकीची माहिती भरल्याने त्यात दुरुस्तीची आवश्यकता आहे. तुम्हाला सुद्धा केवायसीमध्ये दुरुस्ती करायची असेल तर काळजी करू नका. कारण, तुम्हाला केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची एक शेवटची संधी उपलब्ध झाली आहे. या संदर्भात मंत्री अदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करुन माहिती दिली आहे.

बहिणींनो, ई-केवायसी पूर्ण करून घ्या!

योजनेतील महिला लाभार्थ्यांसाठी आता एक मोठा बदल करण्यात आला आहे. केवळ लाभार्थी महिलेचेच नाही, तर त्या महिलेचे पती किंवा वडिलांचे ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नव्या नियमानुसार, सरकार आता लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासोबतच तिच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न पडताळून पाहणार आहे.

  • लाभार्थी महिलांना https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर जाऊन ई-केवायसी करायची आहे.
  • संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमची काही महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती पुन्हा अपलोड करावी लागेल.
  • तुमचे नाव, पत्ता, शिधापत्रिका (रेशन कार्ड) क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्डची माहिती यांचा समावेश असेल. प्रोसेस पूर्ण होईल.

यामध्ये विवाहीत महिलांना आपल्या पतीची आणि मुलींना आपल्या वडिलांची ई-केवायसी देखील करून घ्यावी लागणार आहे. निर्धारीत मुदतीमध्ये प्रक्रिया पार पाडावी लागेल.