MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

Market Price: 18 डिसेंबरला राज्यभरात सोयाबीन बाजारभावात काहीशी घसरण; दर जाणून घ्या!

Written by:Rohit Shinde
Published:
महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये सातत्याने सोयाबीनच्या दरामध्ये चढउतार होताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत सोयाबीनच्या दरामध्ये पुन्हा एकदा घसरण झाल्याची माहिती समोर येत आहे.
Market Price: 18 डिसेंबरला राज्यभरात सोयाबीन बाजारभावात काहीशी घसरण; दर जाणून घ्या!

राज्यातील सोयाबीन बाजारात सध्या दरांमध्ये मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. नव्या हंगामातील आवक वाढत असताना काही बाजार समित्यांमध्ये दर वाढताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी घसरण नोंदली जात आहे. त्यामुळे राज्यभरात सोयाबीनच्या दराबाबत कमालीचे संभ्रमाचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. दर साधारण 4 ते 5 हजारांच्या दरम्यान असल्याचे चित्र सध्या आहे.

सोयाबीन आवक वाढली; दरांवर परिणाम

 राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गुरुवारी , 18 डिसेंबर 2025 सोयाबीनच्या बाजारात चढ उतार पाहायला मिळाला. काही ठिकाणी आवक वाढलेली असतानाच, अपेक्षेप्रमाणे दरांमध्ये मोठी तेजी दिसून आली नाही. शेतकऱ्यांकडून सध्या विक्रीचा दबाव कायम असून, व्यापारी वर्ग मात्र दर्जानुसार निवडक खरेदी करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बहुतांश बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर सरासरी पातळीवर स्थिरावलेले आहेत.

महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादकांच्या अडचणी चांगल्याचा वाढत आहेत. कारण बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनचे आवक नियमित नसल्याने कधी माल जास्त येतो तर कधी कमी, यामुळे बाजारभावामध्ये कमालीची अस्थिरता सध्या पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी 7 हजारांच्या पार पोहोचलेला दर आता 5 हजारांच्या आत आल्याचे दिसते. परिणामी शेतकऱ्यांमध्ये सध्या कमालीची चिंता पाहायला मिळत आहे. राज्यातील सोयाबीन बाजारात सध्या दरांमध्ये मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. नव्या हंगामातील आवक वाढत असताना काही बाजार समित्यांमध्ये दर वाढताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी घसरण नोंदली जात आहे.

18 डिसेंबर रोजी सोयाबीन दरांची काय स्थिती ?

अमरावती बाजार समितीत गुरुवारी सोयाबीनची मोठी आवक नोंदवण्यात आली. तब्बल 4,674 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. येथे लोकल दर्जाच्या सोया-बीनला किमान 3,900 रुपये, तर कमाल 4,350 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर 4,125 रुपये प्रति क्विंटल इतका राहिला. मोठ्या प्रमाणात आवक असूनही दर फारसे घसरले नाहीत, ही बाब शेतकऱ्यांसाठी दिलासादायक मानली जात आहे. मात्र, दर्जेदार मालालाच चांगला भाव मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

नागपूर बाजार समितीत सोयाबीनची आवक 85 क्विंटल इतकी नोंदवण्यात आली. येथे लोकल सोयाबीनला किमान 3,800 रुपये, तर कमाल 4,430 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर 4,272 रुपये राहिला. नागपूर बाजारात तुलनेने दर चांगले राहिले असून, तेल उतारासाठी योग्य असलेल्या मालाला जास्त मागणी असल्याचे दिसून आले. मात्र, ओलसर किंवा कमी प्रतीच्या मालाला अपेक्षेइतका भाव मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा बाजार समितीत 70 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. येथे पिवळ्या सोयाबीनला किमान 3,600 रुपये, तर कमाल 4,355 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर 4,280 रुपये इतका नोंदवण्यात आला. काही प्रमाणात कमी प्रतीचा माल आल्याने किमान दरात फरक दिसून आला, मात्र चांगल्या दर्जाच्या मालाला समाधानकारक भाव मिळाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

सोयाबीनच्या दरात अस्थिरता नेमकी कशामुळे?

महाराष्ट्रात सोयाबीनच्या दरात अलीकडे कमालीची अस्थिरता दिसून येत आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा माल भिजला असून त्यामुळे उत्पादनाची प्रत ढासळली आहे. खराब गुणवत्तेमुळे बाजार समित्यांत दर घसरत आहेत. त्यातच बाजारपेठांमध्ये होणारी अस्थिर आवक आणि व्यापाऱ्यांचा कमी प्रतिसाद यामुळे भावात चढ-उतार वाढले आहेत. काही दिवशी आवक जास्त असल्याने दर कमी होतात, तर आवक घटली की अचानक वाढतात. या अनिश्चित परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आले असून स्थिर दर मिळण्यासाठी सरकारी हस्तक्षेप आणि खरेदी धोरणांची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे.