Dhurandhar Movie : रणवीर सिंहची एक्शन-ड्रामा फिल्म ‘धुरंधर’ बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई करत आहे. केवळ 13 दिवसांत जगभरात तब्बल 600 कोटींचा आकडा पार करणाऱ्या या बिग बजेट चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवरही 400 कोटींपेक्षा अधिक कमाई नोंदवली असून या वर्षातील सर्वात मोठ्या हिटपैकी एक म्हणून चित्रपटाने आपली छाप सोडली आहे. थिएटर कलेक्शनचा जोर कायम असतानाच आता ‘धुरंधर’बाबत ओटीटी विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. सोशल मीडियावर फिल्म ट्रेडशी संबंधित काही पोस्ट्समध्ये असा दावा करण्यात येत आहे की ‘धुरंधर’चे ओटीटी हक्क नेटफ्लिक्सने विकत घेतले आहेत आणि या डीलमुळे नवीन ऑल-टाईम रेकॉर्ड तयार झाला आहे.
किती कोटींची झाली डील?
दाव्यानुसार, या राइट्ससाठी तब्बल 280-285 कोटी रुपयांच्या दरम्यान डील झाल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, याआधी ‘पुष्पा 2’चे ओटीटी हक्क अंदाजे 275 कोटींना विकले गेल्याची चर्चा होती. त्यामुळे ‘धुरंधर’ने ही मर्यादा ओलांडल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. काही पोस्ट्समध्ये मात्र ही डील 130 कोटी रुपयांमध्ये झाल्याचंही सांगितलं आहे. त्यामुळे नेमकी रक्कम कोणती यावर अजूनही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तरीही नेटफ्लिक्सने थिएटर रन सुरू असतानाच इतक्या मोठ्या रकमेत राइट्स खरेदी केल्याचा दावा चित्रपटाच्या लोकप्रियतेवर विश्वास ठेवणारा आहे.
नेटफ्लिक्सचा हा मोठा दांव ‘धुरंधर’च्या जागतिक पातळीवरील मागणी आणि हायपकडे लक्ष वेधतो. चित्रपटाच्या धमाकेदार कमाईसोबतच ओटीटीवरदेखील ‘धुरंधर’ची जोरदार क्रेझ राहील अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे. काही चाहत्यांनी पुष्पा 2 च्या तुलनेत ‘धुरंधर’ला ओटीटीवर अधिक रीपीट व्हॅल्यू असेल, असा अंदाज वर्तवला आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातील पोस्टवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात उमटत आहेत. काही जणांनी ही मोठी डील असल्याचं म्हटलं तर काहींनी आकडे बरोबर आहेत का, अशी शंका उपस्थित केली.
धुरंधरची मोठी कमाई ( Dhurandhar Movie)
दरम्यान, 5 डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’मध्ये रणवीर सिंहसोबत अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन आणि राकेश बेदी यांच्या भूमिका आहेत. 250 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या फिल्मने 13 दिवसांत भारतात 437.25 कोटी नेट कलेक्शन आणि जागतिक स्तरावर 664.5 कोटींचा आकडा गाठला आहे. ओटीटीवर या चित्रपटाचे स्ट्रीमिंग कधी सुरू होणार याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही, मात्र चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.





