MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

धक्कादायक! अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडविण्याची धमकी; प्रशासन अलर्ट

Written by:Rohit Shinde
Published:
अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली असल्याची माहिती मिळाली आहे. प्रशासन अलर्ट मोडवर, तपास सुरू.
धक्कादायक! अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडविण्याची धमकी; प्रशासन अलर्ट

विविध शासकीय कार्यालये आणि सार्वजनिक मालमत्ता बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्यांचे प्रमाण अलीकडे वाढताना दिसत आहे. अशा धमक्यांमुळे प्रशासन, सुरक्षा यंत्रणा आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. प्रत्येक धमकी गांभीर्याने घ्यावी लागल्याने पोलिस, बॉम्ब शोध पथके आणि आपत्कालीन सेवा सतर्क राहतात. कार्यालयीन कामकाज विस्कळीत होते आणि मोठा आर्थिक व वेळेचा अपव्यय होतो. अशीच एक धक्कादायक घटना नुकतीच अहिल्यानगरमध्ये घडली आहे. मुंबईत देखील अशीच एक घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय उडवून देण्याची धमकी

अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली असल्याची माहिती मिळाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी मिळताच जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले असून या प्रकरणात पुढील तपास सुरु करण्यात आला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, 18 डिसेंबर रोजी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. कार्यलयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने बाहेर काढण्यात आले आहे.  बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले असून कार्यालयाची सखोल तपासणी सुरु आहे.

नागपूर-मुंबईतही धमकीचे ई-मेल्स, प्रशासन अलर्ट

तर दुसरीकडे नागपूर जिल्हा सत्र न्यायालय आणि मुंबईतील बांद्रा न्यायालय बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या मेलआयडीवर मेल करत नागपूर जिल्हा सत्र न्यायालया बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांना माहिती मिळताच पोलीस अलर्ट मोडवर असून पुढील तपास करण्यात येत आहे. याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून सत्र न्यायालय परिसरात सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

अनेक वेळा या धमक्या खोट्या ठरतात, तरीही धोका टाळण्यासाठी कठोर उपाय आवश्यक असतात. अशा कृत्यांमागे असणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करणे, सायबर ट्रॅकिंग मजबूत करणे आणि जनजागृती वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. पोलीस आणि संबंधित यंत्रणेकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.