Marathi News

Ladki Bahin Yojana: चिंता मिटली, लाडक्या बहिणींचे ऑक्टोबरचे 1,500 रू उद्यापासून खात्यामध्ये जमा होणार !

Written by:Rohit Shinde
Published:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता उद्यापासून मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे सर्व पात्र महिलांचं लागलं होतं, त्यांना या निमित्तानं दिलासा मिळाला आहे.
Ladki Bahin Yojana: चिंता मिटली, लाडक्या बहिणींचे ऑक्टोबरचे 1,500 रू उद्यापासून खात्यामध्ये जमा होणार !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. कारण, महिलांच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरूवात होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता उद्यापासून मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे सर्व पात्र महिलांचं लागलं होतं, त्यांना या निमित्तानं दिलासा मिळाला आहे.

उद्या, 04 नोव्हेंबरपासून पैसे जमा होणार !

आदिती तटकरे यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती असल्याचं म्हटलंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.

बहिणींनो, ई-केवायसी पूर्ण करून घ्या!

योजनेतील महिला लाभार्थ्यांसाठी आता एक मोठा बदल करण्यात आला आहे. केवळ लाभार्थी महिलेचेच नाही, तर त्या महिलेचे पती किंवा वडिलांचे ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नव्या नियमानुसार, सरकार आता लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासोबतच तिच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न पडताळून पाहणार आहे.

  • लाभार्थी महिलांना https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर जाऊन ई-केवायसी करायची आहे.
  • संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमची काही महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती पुन्हा अपलोड करावी लागेल.
  • तुमचे नाव, पत्ता, शिधापत्रिका (रेशन कार्ड) क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्डची माहिती यांचा समावेश असेल. प्रोसेस पूर्ण होईल.

यामध्ये विवाहीत महिलांना आपल्या पतीची आणि मुलींना आपल्या वडिलांची ई-केवायसी देखील करून घ्यावी लागणार आहे. निर्धारीत मुदतीमध्ये प्रक्रिया पार पाडावी लागेल.

ई – केवायसी नसेल तर काय होणार ?

समोर येणाऱ्या माहितीनुसार, ई-केवायसी नसेल तरी या महिन्याचा हप्ता मिळणार आहे. मात्र पुढील महिन्यापासून महिलांच्या अडचणी वाढणार आहेत. “माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरचा आधी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.”

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews