HSRP नंबर प्लेट नसेल तर सावधान! आता हजारोंचा भुर्दंड बसणार, RTO कडून कारवाईला वेग

Written by:Rohit Shinde
Published:
ज्या वाहनांवर HSRP नंबरप्लेट नसेल, त्यांच्यावर राज्यभरातील आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. राज्यभरात ही कारवाई मागील 2 दिवसांपासून सुरू करण्यात आली आहे.
HSRP नंबर प्लेट नसेल तर सावधान! आता हजारोंचा भुर्दंड बसणार, RTO कडून कारवाईला वेग

तुम्ही जर अद्याप तुमच्या वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसविली नसेल, तर आता वेळीच सावध व्हा….कारण, आता राज्यभरात आरटीओकडून कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला आहे. तुम्ही अजूनही HSRP नंबर प्लेट नसेल लावली तर लवकरात लवकर लावा. अन्यथा आरटीओ ऑफिसरकडून कारवाई करण्यात येईल. आरटीओ कार्यालयांकडून स्टायलिश असलेल्या नंबर प्लेटवर केली जात आहे, ज्यांच्या वाहनावर मराठी आकडे किंवा स्टायलिश आकडे असतील त्यांच्यावर आरटीओ कार्यालयाकडून कारवाई केली जात आहे. महाराष्ट्रात 31 डिसेंबर 2025 पर्यंत हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याची अंतिम मुदत होती, आता ती अंतिम मुदत संपली आहे.

HSRP नंबर प्लेट नसेल तर…

जर तुम्ही अजूनही तुमच्या वाहनाला HSRP नंबरप्लेट लावली नसेल तर लवकरात लवकर लावून घ्या. अन्यथा तुम्हाला दंडाचा भुर्दंड बसण्याची शक्यता आहे. जर पहिल्यांदाच तुम्हाला ट्रॅफिक हवालदरांनी पकडलं तर तुम्हाला 1,000 रूपये इतका दंड आकारला जाईल. जर तुम्ही नियमाचे उल्लंघन सुरूच ठेवले आणि दुसऱ्यांदा पकडलं तर, तुम्हाला 5,000 ते 10,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. शिवाय, तुमच्या गाडीला HSRP नंबरप्लेट नसेल तर मालकी हस्तांतरण, पासिंग किंवा फिटनेस प्रमाणपत्र सारखे RTO चे महत्त्वाचे कामं करता येणार नाहीत. HSRP नंबरप्लेट नसेल तर तुम्हाला अनेक महत्त्वाचे काम करता येणार नाहीत.

HSRP नंबरप्लेट काढण्याची शेवटची तारीख जरीही निघून गेली असली तरीही तुम्ही घाबरू नका. मात्र, आळस केलात तर तो तुम्हाला महागात पडण्याची शक्यता आहे. transport.maharashtra.gov.in या महाराष्ट्र परिवहन विभागाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमच्या वाहनाचा तपशील भरून ऑनलाइन फी भरा आणि ‘फिटमेंट’साठी अपॉइंटमेंट बुक करा. जर तुमच्याकडे अधिकृत अपॉइंटमेंटची पावती असेल, तर पोलीस तुमच्यावर कारवाई करणार नाहीत. HSRP नंबरप्लेटचे अनेक फायदे आहेत.

HSRP नंबर प्लेटचे महत्व नेमके काय ?

HSRP (High Security Registration Plate) ही वाहनांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली नंबर प्लेट आहे, जी भारत सरकारने अनिवार्य केली आहे. महाराष्ट्रातही ही प्रणाली सक्तीने लागू करण्यात आली आहे. HSRP प्लेटमध्ये क्रोमियम-आधारित होलोग्राम, एक कोड, आणि स्थायिक क्लॅम्प्स असतात, जे नकली नंबर प्लेट्सपासून संरक्षण देतात. यामुळे वाहन चोरी रोखण्यास मदत होते आणि ट्रॅफिक व्यवस्थापन सुलभ होते. पोलिस आणि परिवहन विभागासाठी वाहन ओळखणे सोपे जाते. RTO कार्यालयातून अधिकृत वितरकांकडूनच ही प्लेट मिळते. HSRP लागू केल्याने महाराष्ट्रातील वाहनांचे नोंदणी आणि ट्रॅकिंग अधिक पारदर्शक व सुरक्षित झाले आहे. त्यामुळे ती अत्यंत महत्त्वाची ठरते.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews