Marathi News

Market Price: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि सोयाबीनच्या दरामध्ये मोठी घसरण; शेतकरी संकटात !

Written by:Rohit Shinde
Published:
महाराष्ट्रातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांदा आणि सोयाबीनच्या दरामध्ये सध्या कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीतमध्ये आज देखील बाजार समित्यांमध्ये दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Market Price: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि सोयाबीनच्या दरामध्ये मोठी घसरण; शेतकरी संकटात !

कांदा आणि सोयाबीनच्या दराबाबत शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी वाढवणारी अपडेट समोर येत आहे. महाराष्ट्रातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये सध्या कांदा आणि सोयाबीनच्या दरामध्ये कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. रविवार, 28 डिसेंबर 2025 रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये दराची एकूण काय स्थिती राहिली, त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

रविवार दिनांक 28 डिसेंबर रोजी राज्यातील कृषी बाजारात आज शेतमालाच्या दरात पुन्हा चढ उतार दिसून येत आहेत. कांद्याचे दरही काहीसे कमी झाले आहेत. सोयाबीनच्या दरांमध्ये आज काहीशी घसरण झाली आहे. एकूणच दर कसे राहिले, ते सविस्तर पाहू…

बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर घसरले

राज्याच्या कृषीमार्केटमध्ये आज कांद्याची एकूण आवक 1 हजार 277 क्विंटल इतकी झाली. यापैकी 795 क्विंटल सर्वाधिक आवक पुणे बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 600 ते 1650 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. सातारा मार्केटमध्ये आवक झालेल्या 417 क्विंटल कांद्याला प्रतीनुसार कमीत कमी 1000 ते जास्तीत जास्त 2800 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. शनिवारी मिळालेल्या सर्वाधिक दराच्या तुलनेत आज कांद्याच्या दरात काहीशी घट दिसून येत आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी

राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक चांगलीच वाढताना दिसत आहे. याचा फटका आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. कारण, दरांमध्ये घसरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरंतर एकीकडे राज्यामध्ये कांद्याच्या मागणीत वाढ जरी झाली असला तरी दुसरीकडे आवक देखील तेवढीच वाढत आहे. परिणाम कांद्याच्या दरामध्ये कोणतीही लक्षवेधी सुधारणा होताना दिसत नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

सोयाबीनच्या दरात पुन्हा घसरण 

राज्याच्या कृषी मार्केटमध्ये आज 297 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी बुलढाणा मार्केटमध्ये 269 क्विंटल आवक झाली. त्यास प्रतीनुसार 3700 ते 4500 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच बुलढाणा आणि छत्रपती संभाजी नगर मार्केट मध्ये 4500 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. शनिवारी मिळालेल्या सोयाबीनच्या दरात आज पुन्हा घट झाली आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews