सिकंदर शेखला अखेर जामीन मंजूर; कुख्यात गुंडांच्या टोळीला शस्त्रे पुरविल्याचा आरोप

Written by:Rohit Shinde
Published:
पंजाबमधल्या पपला गुर्जर टोळीला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्याच्या आरोपाखाली सिकंदर शेखला अटक करण्यात आली होती. त्याला आता जामीन मंजूर करण्यात आला आहे.
सिकंदर शेखला अखेर जामीन मंजूर; कुख्यात गुंडांच्या टोळीला शस्त्रे पुरविल्याचा आरोप

महाराष्ट्र केसरी आणि आंतरराष्ट्रीय पैलवान सिकंदर शेखला पंजाबमधल्या शस्त्रास्त्रं तस्करी प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. सिकंदर शेखच्या नावावर या आधी कोणताही गुन्हा नव्हता, तसेच तो देशाचा मोठा पैलवान असल्याची बाब लक्षात घेऊन त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. पंजाबमध्ये शस्त्रास्त्रांच्या तस्करी प्रकरणात सिकंदर शेखला अटक करण्यात आली होती.

सिकंदर शेखला 3 दिवसांत जामीन

महाराष्ट्रात स्टार कुस्तीपटू सिकंदर शेखला पंजाबमध्ये अटक करण्यात आली होती. मोहाली इथं सीआयए पथकाने सिकंदर शेख याला पपला गुर्जर टोळीसाठी काम करणाऱ्या चार शस्त्र तस्करांसह अटक केली होती. या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. अखेरीस या प्रकरणात सिकंदर शेखला ३ दिवसांमध्ये जामीन मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मागील महिन्यात ३० ऑक्टोबर रोजी सिंकदर शेखला पंजाबमध्ये अटक करण्यात आली होती. सिंकदर शेख हा महाराष्ट्राचा प्रसिद्ध कुस्तीपटू, रुस्तम ए हिंद, महाराष्ट्र केसरी अशी सिंकदरची ओळख होती. सिकंदरला अटक झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्याला  विमानतळावरून पंजाब पोलिसांनी अटक केली होती.

सिकंदर निर्दोष, आई-वडिलांचा दावा

सिकंदर शेखच्या आई-वडिलांनी त्याच्या निर्दोषतेचा दावा केला आहे. त्यांना वाटतं की सिकंदरला या प्रकरणात फसवलं गेलंय आणि चौकशीनंतर सत्य बाहेर येईल. सिकंदरचे वडील, पैलवान रशीद शेख म्हणाले की, “माझ्या मुलाने अत्यंत कष्टाने नाव कमावले आहे, कोणी तरी फसवून त्याला या प्रकरणात गुतवलं आहे. असा दावे आई-वडिलांकडून करण्यात येत आहे, तरी या प्रकरणात पुढील तपासानंतरच सत्य समोर येणार आहे.

प्रकरणात सुप्रिया सुळेंचीही मध्यस्थी

सिंकदर शेखला अटक झाल्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. सिकंदरच्याा कुटुंबीयांनी सगळे आरोप फेटाळले होते. सिंकदरच्या सुटकेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी  पुढाकार घेतला.  सिंकदर शेख याला न्याय मिळण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. त्यानंतर या घडामोडी घडताना दिसत आहेत. मात्र सिकंदर शेखवरील आरोपांचं काय होणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews