दहावी आणि बारावी परीक्षा या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या टप्पा आहेत. या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीचा पाया घातला जातो. यशस्वी निकाल आत्मविश्वास वाढवतो आणि करिअरच्या संधी निर्माण करतो. त्यामुळे या परीक्षा जीवनातील दिशा ठरवणाऱ्या ठरतात. यंदाचे दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक आता अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीला लागावे लागणार आहे.

10/12 वी बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बारावी बोर्ड परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे. तर दहावी बोर्ड परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार आहे. यंदाच्या वर्षी सुद्धा दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा दोन आठवडे आधी घेण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. कारण, 12 वी बोर्ड परीक्षा ही फ्रेब्रुवारी महिन्यात शेवटच्या आठवड्यात असते, तर दहावीची परीक्षा ही मार्च महिन्यात सुरू असते. मात्र, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वी आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र 10 वीच्या फेब्रु-मार्च 2026 च्या परीक्षांच्या तारखांबाबत शासनाने परिपत्रक जारी केलं असून परीक्षा लवकर होत आहेत.

12 वीची लेखी परीक्षा मंगळवार 10 फेब्रुवारी 2026 ते बुधवार 18 मार्च 2026 (माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाईन परीक्षेसह) होणार आहे. तर, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र 1वीची परीक्षा कालावधी शुकवार 20 फेब्रुवारी 2026 ते बुधवार 18 मार्च 2026 रोजी घेण्यात येणार आहेतच.

तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मुल्यमापन

शासनाच्या परिपत्रकानुसार 12 वी बोर्डाच्या प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षा या 23 जानेवारी 2026 ते 9 फेब्रुवारी 2026 दरम्यान होणार आहेत. तर दहावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन तसेच अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत.

प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच NSQF अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा शुक्रवार 23 जानेवारी 2026 ते सोमवार  09 फेब्रुवारी 2026 रोजी (माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसहसोमवार 02 फेब्रुवारी 2026 ते बुधवार 18 फेब्रुवारी 2026 (शरीरशास्त्रआरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसहशाळाकनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारीमार्च 2026 परीक्षेच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेतउपरोक्त परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईलअसेही सांगण्यात आले आहे.