कल्याण- डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रामध्ये येत्या मंगळवारी पाणी पुरवठा बंद असणार आहे. महानगर पालिका क्षेत्रामध्ये केव्हा पाणी पुरवठा बंद असणार आहे, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये पाणी नसणार आहे, किती वेळासाठी पाणी पुरवठा बंद असेल? याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊ…
कल्याण-डोंबिवलीत पाणीपुरवठा राहणार बंद
नागरिकांना सहकार्य करावे, पालिकेचे आवाहन
दुरूस्तीचे काम करण्यासाठी मंगळवार दि. 30 डिसेंबर 2025 रोजी, सकाळी 09:00 ते रात्री 09:00 वाजेपर्यंत 12 तास नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रामधून डोंबिवली पूर्व आणि पश्चिम विभागामध्ये होणारा पाणी पुरवठा बंद राहणार (शट डाऊन) आहे. महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून नागरिकांना सोमवारी किंवा मंगळवारीच पाणी भरून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय, पाणी पुरवठा बंद राहिल्याच्या दुसऱ्यादिवशी पाणी पुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोबतच, डोंबिवली पूर्व आणि पश्चिममधील नागरिकांनी पाण्याचा साठा करून महानगरपालिकेला सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली.





