Weather Update: महाराष्ट्राच्या काही भागात पुढील 5 दिवसांत पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Written by:Rohit Shinde
Published:
पुढील 4 ते 5 दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा अनेक प्रदेशांमध्ये पावसाला कारणीभूत ठरत आहे.
Weather Update: महाराष्ट्राच्या काही भागात पुढील 5 दिवसांत पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

महाराष्ट्रातील मान्सून पावसाचा प्रभाव सध्या पूर्णपणे संपला असला तरी काही ठिकाणी स्थानिक वातावरणामुळे आणि अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाची शक्यता निर्माण झालेली आहे. ऐन दिवाळीच्या अगोदरही अनेक ठिकाणी पावसाचा सुरुवात झाला असून नागरिकांना यामुळे काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांना अचानक येणाऱ्या पावसामुळे काहीसा त्रास सहन करावा लागत आहे.

राज्यात पुढील 4 दिवस पावसाची शक्यता

पुढील तीन ते चार दिवसांत कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. यामुळे राज्यातील पावसाचे संकट अद्याप पूर्णपणे टळलेले नाही. तसेच, अंदमान समुद्र आणि आग्नेय बंगालच्या उपसागरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम असून, 24 ऑक्टोबर रोजी बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून, दिवाळीच्या सुमारासही नागरिकांना छत्र्या घेऊन फिरावे लागेल, तसेच पावसामुळे वाहतुकीवर आणि सार्वजनिक जीवनावर काहीसा परिणाम होऊ शकतो.

दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा अंदाज

20 ते 25 ऑक्टोबर दरम्यान दक्षिण भारतातील अनेक ठिकाणी पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. 21 ऑक्टोबरपर्यंत तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल येथे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी जोरदार पावसाची नोंद होऊ शकते. याशिवाय, छत्तीसगडमध्ये 20 ते 24 ऑक्टोबर आणि नागालँड, मणिपूर, मिजोरम व त्रिपुरा येथे 20 ते 23 ऑक्टोबर दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.

रब्बी हंगामावर संकट, शेतकरी चिंतेत

सततच्या पावसाळी आणि ढगाळ वातावरणामुळे राज्यातील रब्बीचा हंगाम देखील मागास होण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. दरम्यान नैऋत्य मान्सून राज्यातून पूर्णपणे माघारी फिरला आहे. तयार झालेल्या पोषक हवामानामुळे राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये हलक्यातील मध्यम सरींची शक्यता हवामाना विभाग आणि आगामी काळामध्ये वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेती कामाचे नियोजन करावे असं आवाहन देखील करण्यात आला आहे. शेतकरी सध्या चिंतेत आहेत.