महाराष्ट्रातील हवामानात सध्या सातत्याने अनेक बदल पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत हवामान विभागाकडून राज्यातील थंडीबाबत पुन्हा एकदा नवी अपडेट समोर आली आहे. राज्यातील तापमानात हळूहळू वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. थंडीची लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे. आता थंडीची तीव्रता पुन्हा एकदा कमी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे 02 जानेवारीचे राज्यातील हवामान नेमके कसे असेल, ते सविस्तर जाणून घेऊ…
थंडीची तीव्रता कमी होण्याची शक्यता
राज्यात शुक्रवारी 2 जानवारी रोजी किमान तापमानात आणखी थोडी वाढ होण्याची शक्यता असून गारठा काहीसा कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात या थंडीचा परिणाम शेतीवरही जाणवत आहे. महाराष्ट्राच्या हवामानात बदल जाणवू लागला आहे. मागील काही दिवसांपासून जाणवत असलेली कडाक्याची थंडी आता हळूहळू कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ढगाळ वातावरणामुळे काही भागांत गारठ्याची धार कमी होत असली, तरी राज्यातील अनेक ठिकाणी पहाटेची थंडी अजूनही नागरिकांना जाणवत आहे.
राज्यात सध्या ढगाळ हवामानाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. यामुळे किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. थंडीची तीव्रता काहीशी कमी झाली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. काही ठिकाणी तुरळक स्वरूपात जोरदार पावसाने हजेरी लावली, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सकाळपर्यंत ढगाळ वातावरण कायम होते. महाराष्ट्रातही तापमानातील तफावत स्पष्टपणे दिसून आली. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 31.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ढगाळ हवामानामुळे दिवसा तापमान वाढत असले, तरी रात्री आणि पहाटेच्या वेळी काही भागांत थंडी कायम आहे. त्यामुळे एकुणच नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
थंडीत हार्ट अटॅकचा धोका; हृदयाचे आरोग्य जपा !
सध्या सर्वत्र थंडीचा कडाका पाहायला मिळतोय, अशा परिस्थिती हार्ट अटॅकचा धोका वाढत असतो. अभ्यासातून असे दिसून आले आहे की वर्षभरातील उष्ण महिन्यांच्या तुलनेत, सर्वात थंड हिवाळ्याच्या महिन्यांत लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 30% जास्त असू शकते. हिवाळ्यातील थंडीची लाट केवळ गारवा घेऊन येत नाही, तर ती हृदयविकार असलेल्या लोकांसाठी आरोग्याची गंभीर समस्या निर्माण करू शकते. हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. थंडीत उबदार कपडे घाला आणि पुरेसे पाणी प्या, कारण पाण्याची कमतरता आणि थंडीमुळे रक्त घट्ट होऊ शकतं. दिवसातून थोडा चाला किंवा हलका व्यायाम करा, जेणेकरून रक्तप्रवाह सुरळीत राहील. जास्त तेलकट अन्न टाळा, फळे आणि भाज्या खा. धूम्रपान व मद्यपान टाळा. रक्तदाब व साखर वेळोवेळी तपासा. या सवयी अंगिकारल्यास हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.






