लाडक्या बहिणींनो, 2 महिन्यात ई-केवायसी करून घ्या; e-kyc नेमकी कशी करायची? जाणून घ्या!

Written by:Rohit Shinde
Published:
Last Updated:
लाडकी बहीण योजनेबाबत अत्यंत महत्वाची अपडेट समोर येत आहे. महिलांना २ महिन्यांच्या सरकारच्या अधिकृत पोर्टलवर ई-केवायसी करावी लागणार आहे. याबाबत अधिक माहिती सविस्तर जाणून घेऊ...
लाडक्या बहिणींनो, 2 महिन्यात ई-केवायसी करून घ्या; e-kyc नेमकी कशी करायची? जाणून घ्या!

लाडकी बहीण योजनेतील महिलांकडून झालेले अनियमितता लक्षात घेत सरकार आता सजग झाले आहे. यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील तमाम लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींना आता ई-केवायसी करणे अनिवार्य झाले आहे. या संदर्भात सरकारने परिपत्रक सुद्धा काढलं आहे. आगामी २ महिन्यांच्या आत महिलांना ही केवायसी करून घ्यावी लागणार आहे.

२ महिन्यांत इ-केवायसी करून घ्या! (Ladki bahin yojana e-kyc)

चालू आर्थिक वर्षात हे परिपत्रक जारी झाल्यापासून 2 महिन्यांच्या आत ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. ज्या लाभार्थ्यांनी या कालावधीत आधार प्रमाणीकरण केले नाही, ते पुढील कार्यवाहीसाठी पात्र ठरतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.  तसेच, भविष्यात दरवर्षी जून महिन्यात ही ई-केवायसी प्रक्रिया 2 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक असेल. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुलभ असून, ती भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठीही उपयुक्त ठरेल, असं महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.

सरकारच्या परिपत्रकानुसार…

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी e-KYC माध्यमातून Aadhaar Authentication करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेच्या https://ladakibahin.maharashtra.gov.in या Web Portalवर सदरची e-KYC ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने या Web Portal वर लाभार्थ्यांना प्रथ्यक्षात e-KYC बाबत करावयाची कार्यवाहीची माहितीचा Flowchart ‘परिशिष्ट – अ’मध्ये देण्यात आला आहे. त्यानुसार सदर योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून 2 महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे. सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी Aadhar Authentication केले नाही ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील, याची कृपया नोंद घ्यावी. तसेच या योजनेंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी e-KYC करणे बंधनकारक राहील.

ई-केवायसी कशी करायची? 

  • लाभार्थी महिलांना https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर जाऊन ई-केवायसी करायची आहे.
  • संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमची काही महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती पुन्हा अपलोड करावी लागेल.
  • तुमचे नाव, पत्ता, शिधापत्रिका (रेशन कार्ड) क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्डची माहिती यांचा समावेश असेल. प्रोसेस पूर्ण होईल.

सध्या तांत्रिक कारणांमुळे पोर्टलवर ही प्रक्रिया पूर्णपणे सुरू झालेली दिसत नाही. मात्र, शासनाने लवकरच ही प्रक्रिया सुरू केली जाईल असे सांगितले आहे. त्यामुळे सर्व पात्र महिलांनी वेळोवेळी वेबसाइट तपासत राहावे आणि प्रक्रिया सुरू झाल्यावर तातडीने ती पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच तुम्ही तुमच्या नजीकच्या ऑनलाईन सेवा केंद्र चालविणारांच्या मदतीने देखील ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.