एफडी म्हणजेच ठेवी ही गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय मानली जाते. बँकेत निश्चित कालावधीसाठी ठेवलेल्या रकमेवर ठराविक व्याजदर मिळतो. शेअर बाजार किंवा इतर जोखमीच्या गुंतवणुकींच्या तुलनेत एफडीमध्ये जोखीम खूप कमी असते. निवृत्त व्यक्ती, नोकरदार तसेच बचतीवर हमीदार उत्पन्न हवे असणाऱ्यांसाठी ही गुंतवणूक फायदेशीर आहे. नियमित व्याजाच्या स्वरूपात आर्थिक सुरक्षितता मिळते. एफडीतील गुंतवणूकीचे अनेक महत्वाचे फायदे देखील आहेत, त्याबाबत जाणून घेऊ…

एफडीतील गुंतवणूकीचे फायदे काय?

  • एफडीमध्ये पैसे गुंतवल्यास पैसे गमावण्याची भीती नसते. अशा परिस्थितीत, सुरक्षित गुंतवणूकीसाठी एफडी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
  • एफडीमधील परतावा आधीच निश्चित आहे. गुंतवणुकीनंतर एफडीचा परतावा कमी किंवा जास्त मिळत नाही.
  • एफडी सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा तसेच चांगला परतावा देते.
  • एनबीएफसी एफडीमध्ये 9 टक्के दराने परतावा मिळू शकतो. एवढेच नाही तर ज्येष्ठ नागरिकांना एफडीमध्ये जास्त व्याजाचा लाभ मिळतो.
  • अल्प ते दीर्घ मुदतीसाठी एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता. यात तुम्ही 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता.
  • बँका आणि वित्तीय कंपन्या एफडीवर कर्जाची सुविधा देखील देतात. गुंतवणूकदार कठीण काळात पैशांची व्यवस्था देखील करू शकतात.
  • एफडीमध्ये गुंतवणूक करूनही गुंतवणूकदार करसवलतीचा लाभ घेऊ शकतात. ही सूट आयकर विभागाच्या कलम 80 सी अंतर्गत उपलब्ध आहे.

दिर्घकालीन आर्थिक नियोजनाचा मार्ग

गुंतवणूकदारांना स्थिर परतावा आणि मानसिक समाधान मिळवून देणारा हा सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय गुंतवणुकीचा पर्याय आहे. त्यामुळे एफडीला दीर्घकालीन आर्थिक नियोजनात महत्त्वाचे स्थान आहे. जर तुम्हालाही तुमचे पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही तुमचे पैसे एफडीमध्ये गुंतवले पाहिजेत. एफडीमध्ये दीर्घ काळासाठी गुंतवणूक करून तुम्ही लाखो रुपयांचा नफा कमवू शकता. लोकांमध्ये पैसे गुंतवण्यासाठी एफडी नेहमीच लोकप्रिय राहिली आहे. मुदत ठेवी म्हणजेच एफडीमध्ये गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे ठराविक कालावधीसाठी गुंतवावे लागतात. अशा अनेक फायद्यांमुळे एफडी हा गुंतवणूक दारांमध्ये नेहमीच महत्वाचा आणि लोकप्रिय पर्याय राहिलेला आहे.