ऑनलाईन फायलिंगमध्ये बदल केल्यामुळे करदात्यांना अधिक वेळ मिळावा म्हणून सरकारने 15 सप्टेंबरपर्यंत आयटीआर भरण्यास मुदतवाढ दिली. ज्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक नाही, जसे की बहुतेक पगारदार कर्मचारी त्यांना ही मुदतवाढ दिली गेली आहे. त्याचवेळी, ज्यांच्या व्यवसाय किंवा आर्थिक नोंदींचे ऑडिट केले जाते त्यांच्यासाठी ITR भरण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2025 आहे. उशिरा दाखल केल्याबद्दल दंड होऊ शकतो आणि काही प्रकरणांमध्ये नोटीस देखील पाठवली जाऊ शकते. म्हणून कोणतीही अडचणी टाळण्यासाठी अंतिम मुदतीपूर्वी तुमचा ITR दाखल करणे शहाणपणाचे ठरेल.
काळजीपूर्वक आयटीआर भरा, वेळेत रिफंड मिळवा!
आयटीआर भरताना आपण बऱ्याचदा काही गोष्टींकडे लक्ष देत नाही, ज्यामुळे नंतर आपल्याकडून नकळत चुका घडतात. ITR दाखल करताना लोक अनेकदा मूल्यांकन वर्षाबद्दल गोंधळतात. तुम्ही 2024-25 मध्ये उत्पन्नासाठी आयटीआर दाखल करत असाल तर तुम्हाला 2024-25 हे मूल्यांकन वर्ष निवडावे लागेल पण अनेकदा लोक यामध्ये चुकीची निवड करतात.
आयकर विभागाकडून आयटीआर भरण्यासाठी अनेक प्रकारचे फॉर्म जारी केले जातात पण, बहुतेक वेळी आयटीआर भरताना कोणता फॉर्म आवश्यक आहे याबद्दल करदात्यांमध्ये गोंधळ असतो.
आयटीआर 1 सर्वात सोपा आहे. तुमचं उत्पन्न फक्त पगारातून येत असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. याशिवाय, शेअर बाजार किंवा इतरत्र गुंतवणूक करतात किंवा उत्पन्नाचे इतर स्रोत आहेत त्यांनी आयटीआर 2 फॉर्म वापरायचा.
करदाते आयकर रिटर्न भरतात पण, शेवटची पायरी म्हणजे पडताळणी करायला विसरतात. अशा परिस्थितीत, त्यांना परतावा मिळण्यात अडचणी येतात. लक्षात घ्या की तुम्ही आयटीआर दाखल केला पण, पडताळणी म्हणजे व्हेरिफिकेशन केले नाही तर तुमचे आयटीआर अमान्य घोषित केले जाऊ शकते.
वेळेत आयटीआर भरण्याचे भविष्यात अनेक फायदे
आयटीआर म्हणजेच इनकम टॅक्स रिटर्न भरणे प्रत्येक करदात्याची जबाबदारी आहे. आयटीआर भरल्याने आपले उत्पन्न आणि कराची योग्य नोंद सरकारकडे होते. त्यामुळे भविष्यात कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अडचणी टाळता येतात. बँकेतून कर्ज घेताना, व्हिसा मिळवताना किंवा मोठ्या गुंतवणुकीसाठी आयटीआर आवश्यक ठरतो. सरकारकडून मिळणाऱ्या विविध सवलती व रिफंडसाठीही आयटीआर महत्त्वाचा आहे. वेळेवर आयटीआर भरल्यास करदात्याची विश्वासार्हता वाढते. तसेच भविष्यातील आर्थिक नियोजन आणि संपत्तीची योग्य नोंद ठेवण्यासाठी आयटीआर उपयुक्त ठरतो. त्यामुळे प्रत्येक करदात्याने आयटीआर वेळेवर आणि प्रामाणिकपणे भरावा हेच योग्य आहे.





