Thane Exit Poll : एकीकडे सर्व महानगरपालिका निवडणुकीच्या एक्झिट पोल मध्ये भाजपने आगेकूच केली असली तरी एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे महानगरपालिकेत पुन्हा एकदा शिंदेशाहीच बघायला मिळते. साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ७२ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय तर भाजपला 26 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
ठाण्यात कोणाला किती जागा मिळतील? Thane Exit Poll
ठाणे महापालिकेत एकूण १३१ प्रभाग आहेत. सामच्या एक्झिट पोलनुसार, यामध्ये एकनाथ शिंदेंच्या तब्बल ७२ जागांवर यश मिळू शकतं. भाजपला २६ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १०, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ३, मनसेला २, काँग्रेसला ३ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १५ जागा मिळू शकतात असा अंदाज एक्झिट पोल मध्ये देण्यात आला आहे. Thane Exit Poll
यापूर्वीचा रेकॉर्ड तुटणार?
ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. एकनाथ यांच्या संपूर्ण राजकारणाची जडणघडण ही ठाण्यातून झाली. शिवसेना फुटेनंतरही ठाणेकर एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. यापूर्वी २०१७ मध्ये शिवसेना एकसंध असताना शिंदे यांच्या नेतृत्त्वात पक्षानं ६७ जागा जिंकल्या होत्या. आता याच्यापेक्षाही जास्त जागा शिंदे गटाने जिंकल्या तर हा मोठा रेकॉर्ड होऊ शकतो. एकनाथ शिंदे यांची ताकद ठाण्यात दिवसेंदिवस वाढत चालले आहे याचेच हे एक उदाहरण आहे.





