Tue, Dec 23, 2025

Pune Metro Station Name Changed : पुणे मेट्रो स्थानकांची नावे बदलली; प्रवासाआधी जाणून घ्याच

Published:
गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील काही मेट्रोस्थानाकांची नावे बदलण्याची मागणी उपस्थित केली जात होती. अखेर याबाबत मेट्रोने निर्णय घेत प्रवाशांची मागणी मान्य केली आहे. मेट्रोकडून ३ स्थानकांची नावे बदलण्यात आली आहेत.
Pune Metro Station Name Changed : पुणे मेट्रो स्थानकांची नावे बदलली; प्रवासाआधी जाणून घ्याच

Pune Metro Station Name Changed : तुम्ही पुणेकर आहात आणि मेट्रोने प्रवास करता का? मग तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मेट्रो प्रशासनाकडून पुण्यातील मेट्रो स्थानकांची नावे बदलण्यात आली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील काही मेट्रोस्थानाकांची नावे बदलण्याची मागणी उपस्थित केली जात होती. अखेर याबाबत मेट्रोने निर्णय घेत प्रवाशांची मागणी मान्य केली आहे. मेट्रोकडून ३ स्थानकांची नावे बदलण्यात आली आहेत. आता नवीन नावे मेट्रो स्थानकांची नावे अधिक ओळखीची आणि परिसराशी सुसंगत अशी ठेवण्यात आली आहेत.

काय आहे नवीन नामांतर – Pune Metro Station Name Changed

महामेट्रोने दिलेल्या माहितीनुसार, पुणे मेट्रो प्रकल्पातील तीन महत्त्वाच्या स्थानकांचे नामकरण बदलण्यात आले आहे. मंडई मेट्रो स्थानकाचे नाव आता ‘महात्मा फुले मंडई’ असे करण्यात आले आहे. नळस्टॉप मेट्रो स्थानकाचे नाव ‘एसएनडीटी’ तर आयडियल कॉलनी मेट्रो स्थानकाचे नाव ‘पौड फाटा’ असे बदलण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत या सर्व स्थानकांवरील नेमप्लेट, दिशादर्शक फलक आणि अन्य माहितीफलक नव्या नावांनुसार बदलण्याचे काम पूर्ण केले जाणार असल्याचे महामेट्रोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. Pune Metro Station Name Changed

का बदलली मेट्रो स्थानकांची नावे ?

येत्या काही दिवसांत या सर्व स्थानकांवरील नेमप्लेट, दिशादर्शक फलक आणि अन्य माहितीफलक नव्या नावांनुसार बदलण्याचे काम पूर्ण केले जाणार असल्याचे महामेट्रोतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. या नामांतरामागे स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विविध सामाजिक संघटनांची महत्वाची भूमिका राहिली आहे. विशेषतः मंडई परिसरातील स्थानकाला महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव देण्यात यावं, अशी आग्रही मागणी होती. माळी महासंघ या सामाजिक संघटनेने यासंदर्भात महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) कडे निवेदन दिलं होतं. मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. अखेर केंद्र सरकारकडून या नामकरणाला अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतर हा निर्णय अमलात आणण्यात आला. Pune Metro Station Name Changed. वनाझ ते रामवाडी मार्गिकेवरील नळस्टॉप स्थानक एसएनडीटी कॉलेजच्या जवळ असल्यामुळे त्याला ‘एसएनडीटी’ हे नाव देण्यात आले आहे. तर , आयडियल कॉलनी स्थानक परिसरातील प्रमुख चौक ओळख लक्षात घेऊन, या स्थानकाचं नाव ‘पौड फाटा’ असं करण्यात आलं आहे. या नव्या नावांमुळे प्रवाशांना मेट्रो स्थानक ओळखणे अधिक सोपे होणार असून, दिशाभूल होण्याचे प्रमाण कमी होईल .