MP Breaking News
Tue, Dec 16, 2025

Pune Nagpur Highway : महाराष्ट्रात उभारतोय नवा महामार्ग; पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला जोडणार

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आणि सांस्कृतिक राजधानी पुणे ही दोन्ही शहरे आता एकमेकांना थेट जोडली जाणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत एक मास्टर प्लान सांगितला आहे
Pune Nagpur Highway : महाराष्ट्रात उभारतोय नवा महामार्ग; पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला जोडणार

Pune Nagpur Highway : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आणि सांस्कृतिक राजधानी पुणे ही दोन्ही शहरे आता एकमेकांना थेट जोडली जाणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत एक मास्टर प्लान सांगितला आहे. या नव्या महामार्गामुळे पुणे ते नागपूर हे अंतर अवघ्या पाच तासात गाठणे शक्य होणार आहे.  कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन (CPA) च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर नागपुरातील विधान भवनाबाहेर माध्यमांशी बोलताना गडकरी यांनी नागपूर आणि विदर्भ विभागासाठी अनेक मोठ्या पायाभूत सुविधांच्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी त्यांनी पुणे ते नागपूर महामार्गाचा प्लॅन सांगितला.

काय म्हणाले नितीन गडकरी ? Pune Nagpur Highway

विदर्भ आणि पश्चिम व मध्य महाराष्ट्र यांच्यातील कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी, केंद्र सरकारने १६,३१८ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा पुणे-छत्रपती संभाजीनगर नवीन द्रुतगती महामार्गाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी सामंजस्य करार (MoU) आधीच करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात पुणे-अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर विभागाचा समावेश आहे, तो २,००० कोटी रुपये खर्चून हाती घेतला जाईल. या प्रकल्पात उड्डाणपूल व सहाय्यक पायाभूत सुविधांचा समावेश असेल. Pune Nagpur Highway

संभाजीनगर-नागपूर प्रवासाला २.५ तास लागतील

यानंतर अहिल्यानगरजवळील शिक्रापूरपासून बीडमार्गे संभाजीनगर ग्रीनफिल्ड महामार्गाला जोडणारा एक स्वतंत्र मार्ग प्रस्तावित आहे. या पट्ट्यासाठी टोल-संबंधित निर्णय अद्याप प्रलंबित असले तरी, भूसंपादन आणि संबंधित प्रक्रिया पुढील दोन ते तीन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. “हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, पुणे आणि संभाजीनगर दरम्यानचा प्रवासाचा वेळ सुमारे दोन तासांपर्यंत कमी होईल, तर संभाजीनगर-नागपूर प्रवासाला सुमारे २.५ तास लागतील, म्हणजेच काय तर पुणे-नागपूर दरम्यानचा (Pune To Nagpur) प्रवास अवघ्या ५ तासांत करणे शक्य होणार आहे.