Politics News : प्रफुल्ल पटेल- तटकरे नालायक, नीच, कपटी!; माणुसकी हरवलेली माणसे

Published:
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला अवघे तीन दिवसही उलटले नव्हते आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्ताधारी गटाने सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याची घाई उरकली. शोक, वेदना आणि संवेदनशीलतेचा काळ सुरू असतानाच सत्तेचे गणित मांडण्याची ही अस्वस्थ करणारी लगबग अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे.
Politics News : प्रफुल्ल पटेल- तटकरे नालायक, नीच, कपटी!; माणुसकी हरवलेली माणसे

Politics News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला अवघे तीन दिवसही उलटले नव्हते आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्ताधारी गटाने सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याची घाई उरकली. शोक, वेदना आणि संवेदनशीलतेचा काळ सुरू असतानाच सत्तेचे गणित मांडण्याची ही अस्वस्थ करणारी लगबग अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे. राज्यात आधीच एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असताना आणि सरकारकडे स्पष्ट बहुमत असतानाही हा निर्णय इतक्या तातडीने का घेण्यात आला, हा प्रश्न केवळ राजकीय वर्तुळापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर सर्वसामान्य महाराष्ट्रही अस्वस्थपणे तो विचारू लागला आहे. या संपूर्ण घडामोडींच्या केंद्रस्थानी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ ही चौकडी असल्याचं चित्र समोर आलं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे माजी आमदार अंबादास दानवे यांनी फेसबुक पोस्टद्वारे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर शब्दांचे आसूड ओढले आहेत. कोणतीही राजनैतिक भाषा न वापरता, त्यांनी थेट आणि बेधडक शब्दांत टीकेची झोड उठवली आहे.

काय म्हणाले अंबादास दानवे?Politics News

मेलेल्या माणसांच्या टाळूवर लोणी खाणं
महाराष्ट्रात कधीपासून संस्कृती झाली?
दुःख, अश्रू, मृत्यू
सगळं ज्यांना फक्त संधी वाटतं
प्रफुल पटेल, सुनील तटकरे
ते राजकारणी नाहीत, तर व्यावसायिक आहेत,
भावना शून्य, माणुसकी संपलेली नालायक लोक
नीच आणि कपटी राजकारणाचा निर्लज्ज खेळ खेळताय!
अशी स्थितील यांना कोणी बोलणार ही नाही,
माऊलीच्या वेदनेवर पाय देऊन
सत्तेचे हिशोब मांडले जातायत.
अजित दादा पाहत असतीलच
इतिहास लक्षात ठेवतो.
आणि कर्म कुणालाच चुकत नाही Politics News

शरद पवार पूर्णपणे अंधारात?

या शपथविधीबाबत जेव्हा शरद पवार यांना विचारण्यात आलं, तेव्हा त्यांच्या उत्तराने अनेक अर्थ स्पष्ट झाले. “माझ्याशी कोणतीही चर्चा झाली नाही. आज शपथविधी आहे, हे देखील मला माहीत नव्हतं,” असं स्पष्ट आणि थेट विधान शरद पवार यांनी केलं. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी हा त्यांच्या पक्षाचा निर्णय असल्याचं सांगताना, त्यांनी अप्रत्यक्षपणे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या भूमिकेवर बोट ठेवलं. “तो त्यांचा पक्ष आहे. त्यांनी जे ठरवलं ते त्यांनी केलं. त्यावर मी काही बोलणार नाही,” असं म्हणत त्यांनी आपली नाराजी सूचक शब्दांत व्यक्त केली.